आजची यशोगाथा : भाऊसाहेब गवळी

0

आजची यशोगाथा : भाऊसाहेब गवळी

परिचय पत्र

नाव:  भाऊसाहेब गवळी
उंची: १७० सेंमी
वय: ८० वर्षे
वास्तव्य: सोनई, जि. अहिल्या नगर
व्यवसाय – निवृत्त महाविद्यालय प्राचार्य
समूह: Guardians
मोबाईल: ९८६०१४६०१२
 

मला रात्री चार वेळा लघवीला जाण्याची आरोग्य समस्या होती. मी माझ्या डॉक्टरांना सांगितले. त्यांनी माझ्या रक्त तपासण्या केल्या. त्यात माझे एचबीएवनसी ६.८% निघाले. माझे वजन ८० किलो, पोटाचा घेर ९५ सेंमी आणि उच्च रक्तदाब देखिल होता. डॉक्टरांनी काळजी करण्यासारखे काही नाही असे सांगितले. मला वजन कमी हवे होते आणि साखरही नॉर्मल ला हवी होती.
मला डॉ जगन्नाथ दीक्षित जीवनशैली विषयी माहिती होती. मी लगेच त्यांच्याशी सपंर्क केला. त्यांनी मला त्यांचा एक व्हिडिओ पाठवनू दिला आणि त्यानुसार सुरु करा असे सांगितले. मी आणि माझ्या पत्नीने १३ नोव्हेंबर २०२५ पासून स्वतंत्रपणे जीवनशैलीचे पालन सुरु केले.
फ़ेब्रुअरीत होणार्या ८व्या ९० दिवसांच्या आव्हानात  मला श्रीनिवास सरांनी सहभागी करून घेतले. मग मी गार्डियन ग्रसमूहाचा अधिकृत सदस्य झालो. एकटेपणा गेला आणि समूहजीवन सुरु झाले. मग मजा वाटू लागली. मी वयाची चाळीशी सपंल्यावर नियमितपणे चालण्याचा व्यायाम सुरू केला होता तो आज ऐंशी वर्षे वयातही चालू आहे. श्रीनिवास सरांच्या प्रेरणेने एकदा दिवसभरात पधंरा किलोमीटर व
नंतर साडपंधरा किलोमीटर चाललो. मी नियमितपणे पायी फिरायचा. माझे व्यायामाचे, जेवणाच्या ताटाचे फोटो पाठवून देणे, प्रत्येक महिन्याला रिपोर्ट पाठवून देणे या गोष्टी मी आनंदाने केल्या. तो एक अविस्मरणीय अनुभव होता.
या छोट्याशा प्रवासात माझा श्रीनिवास सरांशी जवळून संबंध आला. त्यांनी खरोखर मन लावून काम केले. माझ्या तब्येतीची काळजी घेतली, योग्य वेळी मला मदत केली. त्यांना हार्दिक धन्यवाद.
डॉक्टर जगन्नाथ दीक्षित फार मोठे आणि अवघड काम करीत आहेत, त्यांचेही आभार. ज्यांच्यामुळे माझा उत्साह वाढला त्या गार्डीयन समूहाच्या सर्व सहभागी सदस्यांचे मनःपूर्वक आभार.

(मराठी पुनर्लेखन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts