आजची यशोगाथा : सुनीत अंगल (१६ जुलै २०२६)
परिचय पत्र
नाव: सुनीत अंगल
वय: ७१ वर्षे
उंची: १६० सेंमी
वास्तव्य: पुणे
*व्यवसाय: SBI पेन्शनर
समूह: वॉरीअर्स
मोबाईल: ९०११०६५१५७
मी आणि माझी पत्नी, सौ. मंजुषा असे दोघेही आम्ही 90 दिवसांच्या आव्हानामधे अगदी शेवटच्या क्षणी फॉर्म भरून सामिल झालो. ही माहिती आम्हाला सौ.मंजुषा ची मैत्रीण सौ. रेणू उत्तेकर यांच्याकडून समजली होती, ज्यांनी हे आव्हान नुकतेच पूर्ण केलेले होते.
१ फेब्रुवारी पासून आव्हान अगदी उत्साहाने सुरू झाले. ऍडमिन कविता मेहेंदळे मॅडमनी पुणे येथील DRC मध्ये यायला सांगितले. त्याप्रमाणे तेथे मी गेलो. आमच्या माहितीचा फॉर्म कविता मेहेंदळे मॅडमनी अत्यंत आपुलकीने व शांतपणे भरून घेतला. त्यामुळे त्यातील सविस्तर व अचूक नोंदीमुळे, माझ्या दोन डायबेटीसच्या औषधा पैकी एक औषध, डॉ. स्वाती कांत सामंत यांचेकडे कडून कमी करण्यात आले. ज्यासाठी मी अनेक वर्ष प्रयत्नशील होतो. त्याच दिवशी प्रत्यक्षात डॉ दीक्षित सर याना भेटता आले.
मार्च अखेर माझी एचबीएवनसी ५.६% झाली आणि डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी मधुमेहावरची औषधे पूर्ण बंद केली. माझे अनेक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले!
या यशाचे श्रेय अर्थातच डॉ दीक्षित सर आणि त्यांच्या पूर्ण टीमला जाते. आम्ही वेळोवेळी विचारलेल्या शंकांचे निरसन कविता मेहेंदळे मॅडम व मीनल डोणगावकर मॅडम यांच्याकडून त्वरित केले जायचे. याचा मला खूप फायदा झाला. नियमित व्यायाम आणि योग्य वेळी योग्य आहार याची सवय झाली. आणि मी पण निग्रहाने, अनेक आमीषे व आळस टाळून सर्व दिवस सक्सेसफुल केले. एकदाही चिट केले नाही.
तसेच माझ्या पत्नीला, सौ. मंजुषाला, पण याचे श्रेय जाते. डॉ दीक्षित सर आणि त्यांच्या कार्यतत्पर टीमचे पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
अखेर मी अशी प्रतिज्ञा करतो कि माझ्या उर्वरित आयुष्यात मी डॉ. जगन्नाथ दीक्षित जीवनशैली काटेकोरपणे अनुसरीन व याचा एक प्रामाणिक प्रसारक ही भूमिका प्रभावीपणे चालूच ठेवीन.
(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)


