आजची यशोगाथा : पांडुरंग जोशी

0

आजची यशोगाथा : पांडुरंग जोशी

परिचय पत्र

नाव: पांडुरंग जोशी
उंची: १८५ सेंमी
वय: ५५ वर्ष
वास्तव्य: सांगली
व्यवसाय: इंजिनियर आणि क्लासेस चालक
समूह: गार्डीयन्स
मोबाईल:  ९४२२७४६९५४

मला वाढते वजन आणि वाढलेली शुगर हे दोन मोठे प्रॉब्लेम होते. मला डॉक्टर  दीक्षित जीवनशैली विषयी युट्युब वर माहिती मिळाली होती. २०१८-१९ मध्ये मी त्यावरून घरच्या घरी त्या जीवनशैलीचे पालन करण्याचा प्रयत्न केला होता.
यानंतर मी आरोग्यप्रेमी या ग्रुपला जॉईन झालो. या ग्रुप वर १ फेब्रुवारी २६ ते १ मे २६ या कालावधीतील ९० दिवसाच्या चॅलेंज विषयी माहिती मिळाली. मी काही झाले तरी या चॅलेंजमध्ये सहभागी होण्याचे ठरवले.
या अभियानामध्ये मला गार्डियन ग्रुप मध्ये ऍड केले गेले. ग्रुप वर रोजच्या कार्डियाक एक्सरसाइज चा आणि थाळीचा स्क्रीन शॉट टाकणे बंधनकारक होते. आमच्या ग्रुपचे ॲडमिन श्री श्रीनिवास बोलबत्तीन सर व निखिल नाफडे सर होते.
या अभियानामध्ये  शुगर डाऊन होणे किंवा भूक लागणे हे प्रकार क्वचितच झाले कारण मी फॉर्म भरलेल्या तारखेपासूनच या दोन वेळेच्या जेवणाची सुरुवात केली होती. या जीवनशैलीच्या पालनात माझी  पत्नी सौ. सावली हिचे मोठे योगदान आहे. पण मध्येच तिलाच एक मेडिकल इमर्जन्सी आल्यामुळे तीन ते चार दिवस मला या जीवनशैलीचे पालन करता आले नाही पण श्रीनिवास सरांच्या सूचनेनुसार आणि माझ्या एक जवळच्या नातेवाइकांनी दिलेल्या मदत आणि सहयोगामुळे माझे अभियान परत पूर्ववत सुरू झाले.
हे अभियान पूर्ण करताना एडमिन  श्रीनिवास सर यांची खूप मोलाची मदत झाली. त्यांच्या प्रोत्साहनामुळे माझा चालण्याचा वेग वाढत गेला आणि व्यायामाची ओढ निर्माण झाली . प्रत्येक समस्येवर त्यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले आणि प्रत्येक महिन्यात सोबत दिलेल्या तक्त्या प्रमाणे मला चांगला रिझल्ट मिळत गेला.
एक महिन्यानंतरच्या मीटिंगमध्ये सौ मेघना भिडे मॅडम व खुद्द डॉक्टर दीक्षित सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या ९० दिवसाच्या अभियानामध्ये माझे एचबीएवनसी ८.५ वरून ६.९%, वजन १०९ वरून ९५ किलो, उपाशीपोटी इन्सुलिन ३.१४ वरून ८.६९  आणि पोटाचा घेर ११९ वरून १०९ सेंटीमीटर वर आला.
मी आता खूप फ्रेश आणि आनंदी फील करतो आहे. डॉक्टर दीक्षित सरांनी दिलेला हा जीवनमंत्र ही जीवनपद्धती म्हणूनच अंगीकारण्याचा प्रयत्न करणार आहे.
मला मिळालेल्या या यशामध्ये डॉ दीक्षित सर, सौ मेघना भिडे मॅडम, श्री श्रीनिवास सर आणि श्री नाफडे सर यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांचा आणि ग्रुप मधील सर्व सदस्य या सर्वांचाच मी शतशः आभारी आहे.
आपल्या या अभियानाची माहिती मी सगळ्यांना देत आहेच, बरेच जण माझ्यातील बदल बघून प्रभावित झाले आहेत आणि ते सुद्धा पुढील 90 दिवसाच्या अभियानाची ची वाट बघत आहेत. या पुढील अभियानामध्ये मी सपत्नीक सहभागी होणारच आहे आणि इतरांना पण या अभियानाची माहिती देत राहणार आहे.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts