आजची यशोगाथा : दक्षाबेन प्रजापती

0

आजची यशोगाथा : दक्षाबेन प्रजापती

परिचय पत्र

नाव: दक्षाबेन प्रजापती
वय: ५६ वर्षे
उंची: १३९ सेंमी
वास्तव्य: कालोल (गुजरात)
व्यवसाय: निवृत्त शिक्षिका
समूह: LEADERS
मोबाईल: ९३२७५११९७३

मला उच्च रक्तदाब, वाढते वजन, सांधेदुखी आणि श्वास घेण्याचा त्रास अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते, ज्याचा माझ्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला होता. याशिवाय, माझ्या डाव्या पायाला पक्षाघात असल्यामुळे चालताना मला खूप लवकर थकवा येत असे आणि त्यामुळे श्वास घेण्याचाही त्रास होत असे. माझ्या भावामार्फत मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांच्या चॅलेंजची माहिती मिळाली.
हे चॅलेंज १ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होणार असल्याचे समजल्यावर मी त्यात सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला. कुटुंबातील समारंभ यांसारखे काही अडथळे येतील याची मला जाणीव होती, तरीही मी पूर्ण क्षमतेने हे चॅलेंज पूर्ण करण्याचा निर्धार केला. माझ्या कुटुंबीयांनीही मला संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
मी पूर्ण निष्ठेने या प्रवासात सहभागी राहिले — जेवणाचे फोटो शेअर करणे, व्यायामाचे अपडेट्स देणे आणि कार्यक्रमात शिकवलेली शिस्त पाळणे हे सातत्याने केले. पहिल्या महिन्यात माझे वजन ७४.३ किलोवरून ७१.३ किलोपर्यंत कमी झाले आणि कंबरेचा घेर ११६ सेंमीवरून १०५ सेंमीपर्यंत कमी झाला. दुसऱ्या महिन्यात वजन आणखी कमी होऊन ६९.९ किलो झाले आणि कंबरेचा घेर ९९.५ सेंमी झाला. आता तिसऱ्या महिन्यात माझे वजन ६७.७ किलो असून कंबरेचा घेर ९६ सेंमी आहे.
९० दिवसांच्या शेवटी:
एचबीएवनसी: ६.१० → ६.००%
उपाशीपोटी इन्सुलिन: १७.५६ → ६.४५
वजन: ७४.३ किलो → ६७.७ किलो
कंबरेचा घेर: ११६ सेंमी → ९६ सेंमी
इतर सुधारणा: ऊर्जा पातळीत वाढ झाली, सांधेदुखी आणि श्वास घेण्याचा त्रास पूर्णपणे नाहीसा झाला आणि आता मला तुलनेने कमी थकवा येत असल्याने अधिक वेळ चालता येते.
माझ्यासाठी सर्वात मोठी जाणीव म्हणजे शिस्त, योग्य मानसिकता आणि आत्मसंयम यांच्या बळावर मी माझे वजन कमी करू शकले आणि अधिक चांगले आरोग्य प्राप्त करू शकले.
स्वतःमध्ये इतका सकारात्मक बदल अनुभवून डॉ. दीक्षित आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या समर्पित भावनेने हे उदात्त कार्य करत आहे, त्याबद्दल माझ्या मनात अत्यंत आदर निर्माण झाला आहे. या मिशनबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते.
मी डॉ. दीक्षित सर, माझ्या ‘LEADERS’ समूहातील अॅडमिन शिवानी पोतनीस मॅडम, अनघा काळे मॅडम आणि संपूर्ण टीमचे त्यांच्या सततच्या मार्गदर्शन आणि पाठिंब्यासाठी मनःपूर्वक आभार मानते.

(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts