आजची यशोगाथा : रविंद्र ढवळीकर ( १८ जून २०२६ )

0

आजची यशोगाथा : रविंद्र ढवळीकर ( १८ जून २०२६ )

परिचय पत्र

नाव : रविंद्र ढवळीकर
वय: ६३ वर्षे
उंची: १५८.५ से.मी.
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: केटरिंग सर्विस
समूह: Warriors
मोबाईल: ९८५०६५०४९५
 

मला गेली १७-१८ वर्ष डायबेटिस आहे. गेली ४ वर्ष ब्लड प्रेशर आहे. दोन्ही साठी रोज २-२ गोळ्या चालू आहेत. माझं रोजचं आयुष्य अगदी मजेत सुरू होतं. तसा वरवर काहीच त्रास नव्हता. माझं एचबीएवनसी कायम ६.३–६.९% या मध्ये असायचं.

पण मध्ये माझा २ महिने अमेरिकेचा दौरा झाला. तिथे खूप वेडंवाकडं खाणं-पिणं झालं. आल्यावर एचबीएवनसी चेक केलं तर ७.७ झालं होतं. असं एकदम वाढलेलं एचबीएवनसी कमी करायचं असेल तर वेगळाच काहीतरी मार्ग घेतला पाहिजे असं वाटलं.

मग मला ३ वर्षांपूर्वी डॉ. दीक्षित सरांचं एका व्याख्यानमालेत ऐकलेलं भाषण आठवलं. आणि माझ्या नात्यातल्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी दिलेला सल्ला आठवला. त्यांनीही मला फक्त डॉ दीक्षित जीवनशैली कर असं सांगितलं होतं.
मी आपल्या DRCC सेंटरमध्ये जाऊन नाव नोंदवलं (१२ जानेवारी २०२६). काही दिवसातच ८ वा चॅलेंज प्रोग्राम डिक्लेअर झाला आणि मी Warriors ग्रुपमध्ये सामील झालो.

नित्यनेमाने रोजचे फोटो पाठवणे, चालण्याचे स्क्रीनशॉट शेअर करणं हे सुरू झालं. रोजच्या खाण्याच्या वेळा, खाण्याचा क्रम हे पाळताना सुरुवातीला थोडं अवघड गेलं. पण मी चिकाटीने ती शिस्त अमलात आणत गेलो.

एका महिन्यातच माझं एचबीएवनसी ६.७% वर आलं आणि माझं वजन ४ किलो कमी झालं. त्याचबरोबर माझं BP पण कमी झालं. हे परिणाम दिसल्यावर माझा कॉन्फिडन्स अजून वाढला. मी अतिशय कडक शिस्त पाळायला लागलो. अगदी बाहेर जेवायला जाताना मी nuts, salad आणि sprouts चा डबा बरोबर घेऊन जात असे. मी फळे आणि गोड पदार्थही कटाक्षाने टाळले. सुरुवातीला चेष्टा झाली पण मी दुर्लक्ष केलं. नंतर सगळ्यांना सवय झाली.

अशा तऱ्हेने ९० दिवस पूर्ण केले.
त्याचे परिणाम खालीलप्रमाणे :
एचबीएवनसी: ७.७ ➝ ६.०%
वजन: ६३.३५ कि. ➝ ५७.४५ कि.
कंबर: ९१ से.मी. ➝ ८३ से.मी.
उपाशीपोटी इन्सुलिन: ११.२० ➝ ६.५७
इतर सुधारणा : डॉ. स्वाती, डॉ. रूपाली आणि डॉ. दीक्षित सरांच्या सल्ल्याने डायबेटिसची औषधं कमी झाली, उत्साह वाढला, दुपारची झोप बंद झाली, त्वचेवर रॅशेस यायचे आणि खाज सुटायची. त्यांचं प्रमाण लक्षणीय कमी झालं.

या माझ्या यशाचे पूर्ण श्रेय डॉ. दीक्षित सरांना आहे. पण त्याचबरोबर माझे ग्रुप अॅडमिन कविताताई मेहेंदळे आणि मीनलताई डोणगावकर यांनाही मी १०० पैकी ११० गुण देईन. माझ्या या यशात त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. तसेच मी माझी पत्नी व माझे कुटुंबीय यांचाही आभारी आहे.

मी आता कायमची ही जीवनशैली पाळेन. माझे यश हे मी माझ्या परिचित सर्व लोकांपर्यंत पोचवेन. तसेच आपल्या कार्यामध्ये हातभार लावण्याची संधी उपलब्ध झाल्यास आनंदाने सहभागी होईन.

पुन्हा एकदा डॉ दीक्षित सर आणि पूर्ण टीमचे आभार मानतो.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts