आजची यशोगाथा : अर्चना केंद्रे

0

आजची यशोगाथा : अर्चना केंद्रे

परिचय पत्र

नाव: अर्चना केंद्रे
वय: ४६ वर्ष
उंची: १५४ सेंमी
व्यवसाय: प्राथमिक शिक्षिका
वास्तव्य: गावखळी, जिल्हा नांदेड
मोबाईल: ८३२९५८३८१३

मला पीसीओडीचा त्रास होत असल्यामुळे मी सप्टेंबर २०२४ मध्ये डॉ. सौ. पल्लवी कदम मॅडमकडे दाखवण्यासाठी गेले. त्यांनी हार्मोनल इम्बॅलन्स झाला आहे आणि काही तपासण्या करा असे सांगितले. त्यामध्ये माझी रक्तशर्करा – २२०, एचबीए१सी – ९.३%, ट्रायग्लिसराईड – ५०० असे होते. त्यांनी मला मधुमेहाच्या गोळ्या चालू करण्यापूर्वी डॉ दीक्षित जीवनशैली आजमावून पाहा असे सांगितले. त्यांनी मला त्या स्वतः ही जीवनशैली पाळत असल्याचे सांगितले आणि या जीवनशैलीबद्दल माहिती सांगितली.
डॉ. दीक्षित जीवनशैली पाळण्यास सुरुवात केल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात माझे वजन ५४ किलोवरून ५० किलो झाले, रक्तशर्करा – १८५ आणि एचबीए१सी – ८.१% झाले. मग माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. मी या जीवनशैलीचे काटेकोर पालन केले. त्यामुळे माझी रक्तशर्करा आणखीनच कमी (१४०) झाली आणि एचबीए१सी – ६.५% झाले. आता वर्षभर झाले, ती १२३ आणि एचबीए१सी – ५.९% आहे.
जीवनशैली सुरू करण्याच्या अगोदर मला थकवा असायचा, कुठल्याच कामाची इच्छाच नसायची, मासिक पाळीचा सुद्धा त्रास व्हायचा. पण ही जीवनशैली सुरू केल्यापासून आणि नियमित एक तास व्यायाम केल्यामुळे माझे सर्व आजार कमी झाले. मला उत्साह आणि आनंदी वाटू लागले.
मी सर्वांना सांगू इच्छिते की डॉ. दीक्षित जीवनशैली म्हणजे बिना गोळीऔषध रोगमुक्त राहण्याचा राजमार्ग आहे. मी दोन वर्ष झाले या जीवनशैलीचे अवलंब करत आहे. माझ्या संपर्कातील सर्वांनाच ही जीवनशैली पाळण्याबद्दल मी सांगते.
मला मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. सौ. पल्लवी कदम मॅडम आणि विनामूल्य मधुमेह मुक्ती आणि लठ्ठपणासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे आमचे प्रेरणास्थान डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मनापासून खूप खूप आभार.
डॉ दीक्षित जीवनशैली पाळा I
मधुमेहाचा आजार आजीवन टाळा I

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts