आजची यशोगाथा : नेहा जोशी ( १० मे २०२६ )
परिचय पत्र
नाव: नेहा जोशी
वय: ६२ वर्षे
ऊंची: १५२ सेमी
व्यवसाय: निवृत्त
वास्तव्य: ठाणे
समूह: Thane-Mumbai Group
मोबाईल: ९८३३१५५५६८
मला २०२३ मध्ये मधुमेह असल्याचे निदान झाले. माझ्या एका मैत्रिणीमुळे मला डॉ. दीक्षित जीवनशैलीबद्दल माहिती मिळाली. तिने ही जीवनशैली पाळून खूप चांगला फायदा घेतला होता.
मी फेब्रुवारी २०२५ पासून डॉ. दीक्षित जीवनशैली पाळायला सुरुवात केली. त्या वेळी माझे वजन ७२.४ किलो होते आणि एचबीएवनसी ९.१% होते.
ही जीवनशैली सुरू केल्यानंतर दोन ते तीन महिन्यांतच माझ्या वजनात आणि एचबीएवनसी मध्ये लक्षणीय सकारात्मक बदल दिसू लागले.
मी आहाराची शिस्त पाळली आणि दररोज ७ ते ८ किलोमीटर चालण्याची सवय लावली. त्यानंतर मी ९० दिवसांच्या चॅलेंजमध्ये सहभागी झाले. आता माझे वजन ६६.२० किलो झाले आहे आणि एचबीएवनसी ६.३% पर्यंत कमी झाले आहे.
मी ही जीवनशैली पुढेही कायम ठेवणार आहे आणि इतरांनाही ती पाळण्याचा सल्ला देणार आहे.
ठाणे सेंटरमधील सर्व टीम मेंबर्स, आमच्या ग्रुपचे अॅडमिन्स आणि डॉ. वेदपाठक सर यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे.
विशेषतः डॉ. दीक्षित सरांनी अशी महान चळवळ सुरू केली आणि मला त्यात सहभागी होऊन लाभ घेण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानते.
(मराठी संपादन: सौ. अंजली संतोष जोशी)


