आजची यशोगाथा : प्रिया मुळे
परिचय पत्र
नाव : प्रिया मुळे
वय: ४८ वर्षे
उंची: १६५ सेंमी
व्यवसाय: बिझनेस
वास्तव्य: पुणे
समूह: पुणे पीडी ग्रुप
मोबाईल: ९४२३५७१४८९
मी प्रिया मुळे वय ४८. माझे वजन ११० किलो होते. माझा नवरा मकरंद ला खूप टेंशन यायचे. काळजी पण वाटत होती. सर्व गोष्टी करून पाहिल्या पण वजन हलतच नव्हते. आम्हाला दोघाना फिरायची खूप आवड आहे. पण मला कुठेही गेल्यावर चालायच म्हटल कि खूप अवघड होत होते. माझी तिरूपती बालाजी वर खूप श्रद्धा आहे. दरवर्षी आम्ही त्याच्या दर्शनाला जातो ते ३५०० पायऱ्या चढून. मी आधी ४.३० तासात पूर्ण करत होते पण दोन वर्षांपूर्वी मला ७ तास लागले.
मकरंद आणि मला डॉ. दीक्षित जीवनशैली माहीत होती पण पूर्ण माहीत नव्हते. डिसेंबर २०२४ मध्ये आम्ही डॉ. दीक्षित सरांचा व्हिडिओ पाहिला आणि समजून घेतला. रक्त तपासणी केली तेव्हा आम्ही दोघेही पूर्व मधुमेही होतो. आम्ही घाबरलो कारण आमच्या कडे मधुमेहाची फॅमिली हिस्ट्री आहे. मग आम्ही डॉ. दीक्षित जीवनशैलीचे पालन सुरू केले. हळूहळू फरक जाणवत होता, वजन पण कमी होत होते, एनर्जी पण वाढत होती. १ मे ला परत तिरूपतीला जायचा योग आला. यावेळी फक्त ३.३० तासांतच, मध्ये काहीही न घेता फक्त पाणी पिऊन वर पोहोचलो. त्यावेळेस डॉ. दीक्षित जीवनशैलीची ताकद समजली.
आता माझे वजन १० किलो ने उतरले आहे. वर्षापूर्वी ऑफिस मधून आले कि थकून जात होते, काही करायची इच्छाच होत नव्हती. पण आता ऑफिस मध्येही इंटरेस्ट घेवून कामाला लागते आणि आल्यावर ही फ्रेश असते. गौरी गणपती मध्येही सर्वांचा स्वयंपाक करूनही रात्री पर्यंत थकल्यासारखे वाटले नाही.
खूप खूप धन्यवाद देते डॉ. दीक्षित सरांना, आमच्या एडमिन ग्रुपला व ग्रुप मेंबर ना आणि श्रीकांत डंके दादाना, त्यांचा एक थंब खूप हुरूप देवून जात होता. त्यांच्यामुळे हे सर्व शक्य झाले.


