आजची यशोगाथा : अनिता आगे

0

आजची यशोगाथा : अनिता आगे

परिचय पत्र

नाव: अनिता आगे
वय: ५४ वर्षे
उंची १४४ सें.मी.
वास्तव्य : कळंबोली, नवी मुंबई
व्यवसाय : गृहिणी
समूह: मुंबई

माझे वजन ६३ किलो होते आणि मी साधारण २० वर्षेपासून वावडंचे त्रासाने त्रस्त झाले होते. याचे जोडीला सतत अम्लता , जडत्व होतेच. मी ऍलोपॅथी, होमियोपथी, युनानी व आयुर्वेदिक या सर्वच उपचार घेऊन सुद्धा काहीही फायदा होत नव्हता.
नाईलाजाने सर्वे दुष्परिणाम सहन करून औषधोपचार चालू ठेवणे क्रमप्राप्त होते. अंडी, मासे, वांगी, गवार. आणि ईतर आवडीचे पदार्थ खाणे पूर्ण बंद होते.
मे महिन्याच्या शेवटी माझे पतीने माझ्या रक्त तपासणी करून घेतली आणि मला ७व्या वजन आहवन बद्दल माहिती दिली .

माझे एचबीए१सी : ६.२ % म्हणजे पूर्वमधुमेह आले होते. त्यामुळे माझी काहीही इच्छा नसतानाही मला बळजबरीने यात सामील व्हावे लागले.

हळू हळू मला याचा फायदा होण्यास सुरुवात झाली. आळस कमी झाला आणि दैनंदिन जीवनात उत्साह वाढू लागला. वावडं गोळी गरज कमी होत गेली. त्यामुळे मी आहार नियम तंतोतंत पाळू लागले. आणि या गोष्टीचा आनंद वाटू लागला. असे असले तरी माझ्या वैयिक्तक कारणाने मी चालणे कंवा इतर कोणताही व्यायाम करत नव्हते.
त्यातच माझे कौटुंबिक कारण मुळे शेवटी २० दिवस मला यातील काहीही पाळता आले नाही. त्यामुळे आता पर्यंत जे केले त्याचाही काही फायदा होणार नाही असे वाटत होते. पण मी पुन्हा सर्व नियम पाळू लागले.
आणि अशा पद्धतीने बळजबरीने सुरू केलेल्या चॅलेंजच्या शेवटी माझे
वजन ६३-५६=७ किलो ,
कंबरेचा घेर ९५-८४= ११ सेमी ,
एचबीए१सी ६.२ ते ६.१% असे कमी झाले होते.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे वावडं पूर्ण बरी झाली असून आता मी काहीही खाल्ले तरी मला त्रास होत नाही. मी जर अधिक मेहनत घेतली असती, नियमित व्यायाम केला असता तर मला यापेक्षाही चांगले परिणाम मिळाले असते याची मला जाणीव झाली आहे. पण मला जो फायदा झाला आहे त्या मुळे मी खूप आनंदात असून या पुढे मी हेच जीवन पद्धती कायम पळणार आहे.
या प्रवासात प्राप्ती गांधी मॅम , कीर्ती मॅम , मयुरेश सर तसेच डॉ दीक्षित सर आणि पूर्ण गुट यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांचे आभार मानणे ऐवजी त्यांचे ऋणात राहणेच मला आवडेल.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts