आजची यशोगाथा : गणेश शेट्ये ( २५ एप्रिल २०२६ )
परिचय पत्र
नाव: गणेश शेट्ये
वय: ४७ वर्षे
व्यवसाय: आर्थिक सल्लागार तज्ञ
उंची: १५७ सेमी
वास्तव्य: गोरेगाव, मुंबई
समुह: DYDN, मुंबई
मोबाइल: ९९८७४९६९८४
मी गोरेगाव, मुंबई येथील रहिवासी आहे. मधुमेहामुळे मला दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येत होत्या. पचनाच्या समस्याही वाढत होत्या.
डॉ. दीक्षित जीवनशैली बद्दल आणि लवकरच सुरू होणाऱ्या ९० दिवसांच्या आव्हाना बद्दल मला एका मित्राकडून माहिती मिळाली.
हे चॅलेंज १ जून २०२५ मध्ये सुरू होत असल्याचे समजल्यावर, मी त्यात सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला. माझे कुटुंब आणि मित्र यासाठी सुरुवातीला फारसे उत्सुक नव्हते, विशेषत: श्रावण महिन्यातील सणांमुळे ते मी या जीवनशैलीचे पालन करू शकेन की नाही याबद्दल साशंक होते.पण मी हे चॅलेंज पूर्ण करण्याचा दृढ निश्चय केला.
पहिल्याच महिन्यात माझे वजन १ किलोने आणि एचबीए1सी ०.४ टक्क्यांनी कमी झाले, ज्यामुळे मला खूप हुरूप आला. मला अधिक उत्साही वाटू लागले. ९० दिवसांच्या संपूर्ण चॅलेंजमध्ये, मला समूहातील ॲडमिन्स चे सतत प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाले. तसेच, माझ्या समूहा मधील इतर सदस्यांच्या क्रियाकलापांमुळेही मला प्रोत्साहन मिळत राहिले. मी दररोजचे जेवण आणि व्यायामाचे स्क्रीनशॉट्स समूहामध्ये नियमितपणे शेअर केले. मला समूहाचा भाग बनून एकंदरीत खूप आनंद मिळाला. ९० दिवसांनंतर निकाल स्पष्ट झाले. माझे वजन २.१० कि.ग्रॅ. ने आणि एचबीए1सी २ टक्क्यांनी कमी झाले. कंबरेचा घेर किंचित कमी झाला. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आता मला स्वतःवर इतका विश्वास आहे की मी या अद्भुत जीवनशैलीचे पालन करून मी मधुमेह मुक्त होऊ शकेन. माझ्या बाबतीत या जीवनशैलीचा सर्वात मोठा फायदा हा झाला की,श्रावण महिन्यांत साजऱ्या होणाऱ्या पारंपारिक सणांमुळे माझ्या आहारावर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही.
बदलांची सारणी सोबत जोडलेली आहे.
मी डॉ. दीक्षित सरांचा मनापासून आभारी आहे. या संपूर्ण प्रवासात सतत मार्गदर्शन आणि प्रोत्साहनासाठी मी पूजा पवार मॅडम आणि शिवानी पोतनीस मॅडम यांचाही आभारी आहे. तसेच, या चॅलेंजमध्ये मला मनापासून पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या पत्नीचेही मनःपूर्वक आभार.
(मराठी पुनर्लेखन: निखिल नाफडे)


