आजची यशोगाथा : कल्याणी मोरे ( १९ मार्च २०२६ )

0

आजची यशोगाथा : कल्याणी मोरे ( १९ मार्च २०२६ )

परिचय पत्र

नाव : कल्याणी मोरे
वय: ३६ वर्षे
उंची: १६३ सेंमी
व्यवसाय: स्वयंरोजगार
वास्तव्य: पुणे
समूह: पुणे पीडी ग्रुप
मोबाईल: ८१४९६१००४०

कोविड महामारीच्या काळात मी माझ्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. तेव्हापासून माझे वजन सतत वाढत होते. गेल्या ५ वर्षांपासून परिस्थिती तशीच होती आणि मला पाठदुखी तसेच मूड स्विंग्सचा त्रास होऊ लागला. माझ्या जीवनशैलीत व्यायामाचा अभाव, अवेळी जेवण आणि अपुरी झोप या समस्या होत्या.
माझ्या पतीने मला डॉ. दीक्षित जीवनशैलीच्या ७ व्या वजन कमी करण्याच्या आव्हानाबद्दल सांगितले. दरवर्षीच्या आरोग्य तपासणीत माझा एचबीए१सी नेहमी नॉर्मल असायचा, त्यामुळे यावेळीही तो नॉर्मलच असेल अशी मला खात्री होती. पण जेव्हा मी १७/०५/२०२५ रोजी माझ्या चाचण्या केल्या तेव्हा मला खूप धक्का बसला. माझे एचबीए१सी ६.२ होते आणि उपाशीपोटी इंसुलिन १०.२ होते, वजन ६८ किलो व उंची १६३ सेमी होती.

दुसऱ्याच दिवसापासून मी डॉ. दीक्षित जीवनशैलीचे पालन करण्यास सुरुवात केली. मी दररोज १ तास चालणे आणि सर्व आवश्यक क्रमांचे पालन करून दिवसातून २ वेळा जेवण करणे सुरू केले. जेव्हा जेव्हा बाहेर फिरणे शक्य नसायचे तेव्हा आम्ही घरी डॉ. रत्ना मॅडमचे व्यायाम करायचो. आम्ही दोघेही पती पत्नी ही जीवनशैली पाळत होतो. सुरुवातीचे १० दिवस खूप कठीण होते कारण मला वेगाने चालता येत नव्हते, पण मी हार मानली नाही. हळूहळू पण सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मला माझा चालण्याचा वेग वाढवता आला.

१ महिन्याच्या आत २ जेवण आणि दररोज व्यायाम करण्याची सवय लागली. १ महिना यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आम्ही पुन्हा चाचण्या केल्या. पहिल्याच महिन्यात माझे एचबीए१सी ५.७ पर्यंत कमी झाले. यामुळे मला ही जीवनशैली पुढे चालू ठेवण्यासाठी खूप प्रेरणा मिळाली.

मात्र, चॅलेंजच्या शेवटच्या महिन्यात सततच्या प्रवासामुळे मला दररोज व्यायाम करता आला नाही, पण मी केवळ २ वेळाच जेवण घेतले.

चॅलेंज संपल्यानंतर माझा एचबीए१सी ५.६ होता, वजन ६०.४ किलो झाले होते आणि फास्टिंग इन्सुलिन सुद्धा ८.२ पर्यंत कमी झाले होते. मी पूर्व मधुमेही ची मधुमेह मुक्त झाले आहे. मला आता अधिक उत्साही आणि हलके वाटते आहे, तसेच माझी पचनशक्ती सुधारली आहे.

या संपूर्ण प्रवासात मला माझे पती डॉ. प्रशांत मोरे आणि माझ्या मुलांचे सहकार्य मिळाले ज्यांनी मला दररोज व्यायाम करण्यास प्रेरित केले.

इतकी सुंदर जीवनशैली सुरू केल्याबद्दल डॉ. दीक्षित सरांचे मनापासून आभार, तसेच या प्रवासात सतत प्रेरणा दिल्याबद्दल श्रीकांत डंके सरांचेही खूप खूप आभार.

शेवटची एक गोष्ट मी येथे नमूद करू इच्छिते की पालक म्हणून आम्हाला आनंद आहे की मी माझ्या दोन्ही मुलांसमोर बालपणापासूनच या निरोगी जीवनशैलीचे एक चांगले उदाहरण मांडत आहे.

(मराठी संपादन : श्रीनिवास बोलाबत्तीन)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts