आजची यशोगाथा : माधवी शिंत्रे ( १४ मार्च २०२६ )
परिचय पत्र
नाव: माधवी शिंत्रे
वय: ७० वर्षे
उंची: १६५ सेंमी
व्यवसाय: निवृत्त बँक कर्मचारी
वास्तव्य: पुणे
समूह: पुणे PD ग्रुप
मोबाईल: ८१७७८३३३६९
चुकीच्या आहार विहारामुळे माझं वजन कमीच होतं नव्हतं . वर्षभरात येणारे सणवार आणि समारंभ हे त्यात भरीला. मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांचे चॅलेंज या बद्दल यूट्यूब वर माहिती मिळाली. नेमकी त्याच वेळेला मी ऑस्ट्रेलियात मुलीकडे एक वर्षासाठी राहायला आले. श्री श्रीकांत डंके सरांशी संपर्क साधून मी नोंदणी करून घेतली. नियमबाह्य जाऊन तसें काहीच करायचे नव्हते. रोजचेच पण शिस्तबद्ध जेवण आणि तेही दिवसातून दोनदा. घरात मुलीला सांगून तिलाही नोंदणी करायला लावले. माझ्या यजमानांची थाळी बघून तर आम्हाला हेवाच वाटायचा कारण हिरव्या पालेभाज्यांची कमी आम्हाला इथे ऑस्ट्रेलियात जाणवत होती. शिवाय कडधान्याला मोड येतं नव्हते. अजूनही दिवसाचे तापमान १२° आहे. पायांची बोटे थंडीने काळी ठीक्कर पडली. मग काय बाहेर जाणं बंद झालं, घरातच व्यायाम करायला लागले. जागच्या जागी ब्रिस्क वॉक करत होते. शाळेत शिकवलेले ड्रिल व्यायाम घरात करत होते. एवढे मात्र पक्के गाठीशी बांधले होते कीं काहीही होवो दोनदा जेवणाखेरीज तोंड हलवायचे नाही.
शेवटचा महिना मला दुपारचे जेवण जास्त होऊ लागले आणि रात्रीचे पचत नाही असे वाटू लागले म्हणून परवानगी घेवून मी एक वेळचे जेवण चालू केले. जेवणाचे फोटो शेअर करणं ही छान संकल्पना वाटली. आधी काय खावे मग काय खावे हे ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्’ केले. का, किंतु, परंतु ठेवलेच नाही त्यामुळे यशही अपेक्षेप्रमाणे आले.
या अभियानातून एक गोष्ट निश्चित कळली कीं आपल्याला आयुष्यभर खाऊन पिऊन छान राहायचं असेल तर सगळ्या गोष्टी प्रमाणातच झाल्या पाहिजेत. समोर दिसली वस्तू तरी ती तोंडात जातं नाही. ती जेवणाच्या ताटात असते.
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ दीक्षित आणि संपूर्ण अडोर ट्रस्ट यांची मनापासून आभारी आहे. श्री श्रीकांत डंके सर आमचे ऍडमिन यांनी वेळोवेळी आम्हाला आमची घसरलेली गाडी रुळावर नेण्यास मदत केली.
तीन महिन्यातील माझी प्रगती ……
वजन….. ७४ किलो (८ किलो ४०० ग्रॅम नी कमी झाले)
पोटाचा घेर….. ९५ सेमी (९ सेंमी कमी झाला)
(मराठी संपादन: श्रीनिवास बोलाबत्तीन)


