आजची यशोगाथा : दिगंबर भदाणे ( १२ मार्च २०२६ )

0

आजची यशोगाथा : दिगंबर भदाणे ( १२ मार्च २०२६ )

परिचय पत्र

नाव: दिगंबर भदाणे
वय: ४६ वर्ष
उंची: १६४ से.मी.
*वास्तव्य: धुळे (महाराष्ट्र)
व्यवसाय: महावितरण ऑपरेटर
समूह: DM 46
मोबाईल: ९८२३९७४०१०

मला सांगताना खूप आनंद होत आहे की डॉ दीक्षित जीवनशैलीमुळे किती मोठा बदल होऊ शकतो याचे मी एक ज्वलंत उदाहरण आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये माझ्या घशाच्या ऑपरेशनसाठी फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक होते. त्या वेळी पॅथॉलॉजी रिपोर्टमध्ये अनपेक्षितपणे मला मधुमेह असल्याचे निदान झाले. माझी सरासरी शुगर २२३ होती आणि एचबीएवनसी ९.४% होता. यापूर्वी मला कोणतेही लक्षण जाणवले नव्हते, त्यामुळे ही बाब माझ्यासाठी धक्का होती.
डॉक्टरांनी औषधे सुरू केली, पण मी मनोमन ठरवलं की फक्त फिटनेस रिपोर्ट व्यवस्थित येईपर्यंतच औषधे घ्यायची. ऑपरेशन व्यवस्थित झाल्यावर मी औषधे बंद केली आणि त्याच काळात मला माझ्या मित्रांकडून डॉ. जगन्नाथ दीक्षित सरांच्या दोन वेळा जेवणाच्या संकल्पनेविषयी माहिती मिळाली.
मी यूट्यूबवर सरांचे अनेक व्हिडिओ पाहिले, चॅनेल सबस्क्राईब केले आणि कुठल्याही ग्रुपमध्ये न सामील होता स्वतःहून त्यांची जीवनशैली तंतोतंत पाळायला सुरुवात केली. केवळ तीन महिन्यांत माझ्या रिपोर्टमध्ये मोठा फरक दिसू लागला — एचबीएवनसी ९.४ वरून ६.९% वर आला, वजन ७२ किलोवरून ६८.२ किलोपर्यंत कमी झाले.

यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि मी डॉ. सतीश पाटील सरांच्या ग्रुपमध्ये सामील झालो. त्यांनी डॉक्टर दीक्षित जीवनशैलीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मी त्यांच्या सर्व सूचनांचे मनापासून पालन केले. परिणामी सहा महिन्यांत माझे ९ किलो वजन कमी झाले, एचबीएवनसी खाली आला आणि माझ्या पोटाचा घेर ७ सें.मी. ने कमी झाला.
या बदलाने माझ्या आजूबाजूच्या अनेक मित्रांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली — “तू एवढा फिट कसा झालास?”
आणि मी अभिमानाने सांगतो — हा सारा परिणाम डॉ जगन्नाथ दीक्षित जीवनशैलीचा आहे.
आज मी स्वतःही या जीवनशैलीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य आनंदाने करीत आहे.
या जीवनशैलीमुळे मला शरीर हलके, मन प्रसन्न, उत्साह वाढलेला, आणि सकाळी वेळेवर उठण्याची सवय लागली आहे.
माझ्या या प्रवासात डॉ जगन्नाथ दीक्षित सर आणि आमचे ग्रुप ऍडमिन डॉ. सतीश पाटील सर यांचे मनःपूर्वक आभार मानतो. त्यांचे योग्य वेळी दिलेले मार्गदर्शन, टिप्स, आणि शंका निरसन यामुळेच आज मी आत्मविश्वासाने ही माझी यशोगाथा सांगू शकतो.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts