आजची यशोगाथा : सचिन जगताप ( ५ मार्च २०२६ )
परिचय पत्र
नाव: सचिन जगताप
वय: ५२ वर्ष
उंची: १७७ सेमी
वास्तव्य: पुणे सिटी
व्यवसाय: फोटोग्राफी
समूह: ADORE पुणे
मोबाईल: 9371239961
माझी सुरवात, एप्रिल, 2025 पासून झाली. मला मध्य रात्रीला फार लघवी यायची. त्यामुळे माझी झोप तुटायची.नंतर झोप फार उशीरा यायची.
ह्या कालावधी मध्ये माझे वजन देखिल फार वाढलेले होते. (84 KG) त्यामुळे मला काम करताना खुप थकवा आणि घाम यायचा.त्यामुळे माझे मित्र व नातेवाईक मला फार नावे ठेवायची.
मी जून 17 तारखेला कामानिमित्त माझ्या भावाकडे कल्याण येथे ट्रेन ने चाललो होतो. त्या वेळी मला गाडीमध्ये फार त्रास होऊ लागला.मला सारखे घाबरल्या सारखे होऊ लागले. आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. कसेबसे मी भावाकडे पोहचलो त्या रात्री जेवण करून झोपलो आणि रात्री पुन्हा मला तीन च्या दरम्यान लघवीला आली. मी ऊठून लघवीला जाऊन आल्यानंतर मला पुन्हा घाबरल्यासारखे होवू लागले. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मी घाबरून हॉल मध्ये आलो ,सर्व फॅन चालू केले, खिडक्या खोलल्या, त्यानंतर मला कुठे बरे वाटले.
सकाळी भावाला व वहिनी ला सांगितले तेव्हा भाऊ मला दवाखान्यात घेऊन गेला. तिथे माझा ई. सी. जी. / बी.पी./ शुगर चेक केली असता माझी शुगर वाढलेली PP 291 व एचबीएवनसी 8.1% होती. मला डॉक्टरांनी लगेचच गोळ्या चालू केल्या परंतु गोळ्या सुरू करण्या अगोदर मी माझ्या मित्रांचा सल्ला घेण्याचे ठरविले.
मी माझा मित्र महेश भिसे याला संपर्क केला.तो देखिल मधुमेही होता. त्याने देखिल डॉ. दीक्षित जीवनशैली सुरू केली होती. त्याच्यात देखिल भरपूर बद्दल झाला होता. त्यामुळे मी त्याचा सल्ला घेतला. त्याने मला सांगितले की तुझे रिपोर्ट घेऊन संध्याकाळी माझ्याकडे ये. मी ठरलेल्या वेळी त्याच्याकडे गेलो तेव्हा तो मला डेक्कन च्या सेंटर ला घेऊन गेला. मला तिथे डॉ. दीक्षित जीवनशैली बद्दल सर्व माहिती जोशी सरांनी दिली.
परंतु मला नाईट व्हिजन चा त्रास असल्यामुळे मी थोडा घाबरून होतो.मी लागलीच आय सर्जन डॉ. ऐश्वर्या मुळे यांची भेट घेतली.माझी treatment त्यांच्यकडे सुरू असल्यामुळे त्यांनी सांगितले की तीन महिने डॉ. दीक्षित जीवनशैली अवलंबून बघण्यास काही हरकत नाही. त्यांनी जेव्हा मला सपोर्ट केला तेव्हा पासून मी डॉ. दीक्षित जीवनशैली अमलात आणली.पहिल्या महिन्यात माझे वजन चार किलोने कमी झाले, एचबीएवनसी 7.4 झाले. माझा उत्साह वाढला. मी फार आनंदी राहू लागलो आणि त्याचा रिझल्ट आज तुमच्या समोर आहे.
माझा पहिला रिपोर्ट पाहून डॉ. दीक्षित सरांनी मला सांगितले होते की तुम्ही दिवाळी पर्यंत non diabetic होवून जाताल. आणि त्यांचे हे शब्द आज खरे ठरले. मी अगदी मनापासून डॉ. दीक्षित सरांचा ॠणी आहे. त्यांनी देखिल वेळोवेळी मला धीर दिला. तसेच डॉ. स्वाती सामंत मॅडमचे देखिल धन्यवाद. त्यांनी देखिल मला खुप सहकार्य केले. मी पुर्ण डॉ. दीक्षित जीवनशैली टीमचा आभारी आहे. तसेच मी माझ्या आईचा देखिल ॠणी आहे ती दररोज मला अगदी वेळेवर सर्व पदार्थ क्रमानुसार अजून देखिल देते.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.
(मराठी लेखन: शिल्पा उनकुले)


