आजची यशोगाथा : विश्वास दत्ताराम गावडे
परिचय पत्र
नाव: विश्वास दत्ताराम गावडे
वय : ५९ वर्षे
उंची: १६० सेंमी
वास्तव्य: नवी-मुंबई, नेरुळ
व्यवसाय: जवाहरलाल नेहरू पोर्ट मधून सेवानिवृत्त.
समूह: ७वे वेटलाॅस चॅलेंज, ठाणे मुंबई गृप.
मोबाईल : ८७७९१३५०७३.
आजची यशोगाथा
सर्वांना नमस्कार
मला माझा भाऊ उमेशने २०१८ च्या आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सरांचा १ तास ४० मिनिटांचा व्हिडिओ पाठवला आणि व्हिडिओ ऐकून त्यात काय चांगले आहे ते सांगण्यास सांगितले. मी तो व्हिडीओ ऐकून नंतर जिचकार सरांचा ऐकला. मला पटले. मी भावाला व पत्नीला डाॅ.दीक्षित जीवनशैली बद्दल समजावून सांगितले. एकादशी पासून आपल्या आरोग्यासाठी सोपी आणि साधी डाॅ. दीक्षित जीवनशैली सुरु केली. त्यावेळी मी मधुमेह मुक्त होतो. बी. पी. ची गोळी चालू होती. वजन ६५/६६ असायचे.
मी डाॅ.दीक्षित जीवनशैली, त्याबद्दलचे व्हिडिओ आणि सरांची पुस्तके देऊन जे संपर्कात येतील त्यांच्यामधे जागरुकता निर्माण करत होतो. त्यात काही डाॅक्टरंना मी पुस्तके दिली. वरील सर्व व्यवस्थित चालू असताना करोना आला आणि पुन्हा जीवनशैलीत बदल झाला. शारीरिक आणि मानसिक ताण वाढला. मला अम्लपित्ताचा त्रास चालू झाला. ३/४ डाॅक्टर झाले. डाॅक्टर सांगत दोन दोन तासांनी थोडे थोडे खा. जास्त वेळ उपाशी राहू नका. औषध घेतले की बरं वाटे. पुन्हा चालू. मला सरांची जीवनशैली मनाला एवढी पटली होती की मी ती पुन्हा चालू केली. परंतु माझा वरील त्रास कमी होत नव्हता.
१६/८/२४ चे रिपोर्ट-
एचबीए वन सी ७.१,
उपाशीपोटी इन्सुलिन १८.५७.
मी कळंबोली येथे राहणाऱ्या श्रीमती नम्रता ताईंशी संपर्क साधला आणि त्यांनी मला मार्गदर्शन करून दिक्षित फॅन गृप मधे घेतले. परत जीवनशैली चालू केली.
१६/१०/२४ चे रिपोर्ट –
एचबीए वनसी- ७.२ ,
उपाशीपोटी इन्सुलिन २१.५९
मी श्रीमती नम्रता ताईंशी संपर्क साधला. त्यांनी दीक्षित सरांना रिपोर्ट पाठवण्यास सांगितले. सरांशी बोलणे झाले त्यांनी दिनचर्या विचारुन मला आहारात काजू आणि पिस्ता बंद करून चार बदाम दोन अक्रोड हा बदल सांगितला. मी तसे चालू केले. नंतर मला दिक्षीत फॅन गृप मधे श्रीमती नम्रता ताईंकडून ९० दिवसाचे सातवे आव्हाना बद्दल समजले. मी ते स्वीकारले. डाॅ.दीक्षित जीवनशैली पुन्हा चालू झाल्यावर सुरवातीला स्क्रिन शाॅट, गुगल फाॅर्म भरतांना अडखळत होतो नंतर सारे जमले.
– माझे वजन ४.७कि,
– पोटाचा घेर ५सेंमी,
– एचबीए वन सी -१.३,
– उपाशी पोटी इन्सुलिन – १३.९१ ने कमी झाले आहे.
मला डाॅ.दीक्षित जीवनशैली मुळे आरोग्यदायक जीवनशैली मिळालेली आहे. ती मी जन्मभर पाळण्याचा प्रयत्न करीन.
आम्हाला सतत मार्गदर्शन करणाऱ्या (आहार व इतर एक्टिविटी विषयी) मयुरेश सर, प्राप्ती मॅडम, किर्ती मॅडम, नम्रता मॅडम आणि इतर सर्व मंडळीचे आभार.
डाॅ.जिचकार सर, डाॅ.दिक्षित सर यांना नमस्कार! खूप खूप आभार,धन्यवाद!


