आजची यशोगाथा : धनंजय सहस्त्रबुद्धे ( ४ फेब्रुवारी २०२६ )

0

आजची यशोगाथा : धनंजय सहस्त्रबुद्धे ( ४ फेब्रुवारी २०२६ )

परिचय पत्र

नाव: धनंजय सहस्त्रबुद्धे
वय: ५८ वर्षे
उंची: १६० सेमी
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: बँकिंग नोकरी
समूह: पुणे DYDN
मोबाईल: ९९६०९६६६३७

माझ्या भावजयीमार्फत मला डॉ. दीक्षित लाइफस्टाईलची माहिती मिळाली. वजन कमी करण्याच्या उद्देशाने मी ही जीवनशैली स्वीकारण्यास सुरुवात केली. सुरुवातीला माझे वजन ८३ किलो होते. हे पाहून मी खूपच आश्चर्यचकित झालो आणि शक्य तितक्या लवकर वजन कमी करण्याचा ठाम निर्णय घेतला. माझे अहवाल सादर केल्यानंतर मी २०२० साली ग्रुपमध्ये सहभागी झालो. मी कायमच प्री-डायबेटिक होतो.
डॉ. दीक्षित लाइफस्टाईलचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे माझे वजन ६ किलोने कमी झाले आणि एचबीएवनसी ६.५% वरून ६.२% पर्यंत कमी झाले. मी यशस्वीरित्या दोन वजन कमी करण्याची चॅलेंज पूर्ण केली आहेत — ५वे चॅलेंज २०२३ मध्ये आणि ७वे चॅलेंज २०२५ मध्ये.
७व्या वजन कमी करण्याच्या चॅलेंजदरम्यान माझा प्रगती अहवाल पुढीलप्रमाणे आहे —
वजन: ७८.२ किलो ते ७३ किलो
कंबर: ९४ सेमी ते ८८ सेमी
एचबीएवनसी: ६.८% ते ६.७%
फास्टिंग इन्सुलिन: २५.६ ते १४.७०

डॉ. दीक्षित लाइफस्टाईलमुळे मी निरोगी जीवनाचा आनंद घेत आहे. ही जीवनशैली कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा मी निर्णय घेतला आहे. यासाठी मी मनापासून डॉ. दीक्षित आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो.

(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts