आजची यशोगाथा : किशोर बनकर (२६ जानेवारी २०२६)

0

आजची यशोगाथा : किशोर बनकर (२६ जानेवारी २०२६)

परिचय पत्र

*नाव: किशोर बनकर *
वय: ६२ वर्षे
उंची: १७१ सेमी
व्यवसाय: सेवानिवृत्त
वास्तव्य: पुणे
मोबाईल: ९४२३०३२१४१

डिसेंबर २०२४ मधील शेवटच्या आठवडय़ात मला थोडा थकवा आणि गरगरायला लागले म्हणुन माझ्या ब्लड टेस्ट करून घेतल्या. माझे रिपोर्ट चांगले नव्हते. माझे एचबीएवनसी खूपच जास्त म्हणजे ११.७ % येवढे आले. अर्थातच डॉक्टरांनी मधुमेहावर औषधे सुरू केली. पण मला खूप टेंशन आले होते. मला आयुष्यभर औषधं घ्यायची इच्छा नव्हती. मी यूट्यूब वर शोध घेतला तेंव्हा डॉ जगन्नाथ दीक्षित यांच्या जीवनशैली बाबत माहिती मिळाली. व्हिडिओ खालील मोबाइल वर msg करून या अभियाना मधील सह समन्वयक सौ कविता मेहेंदळे यांच्याशी संपर्क साधला. माझे एचबीएवनसी १० पेक्षा जास्त असल्याने त्यांनी काही जास्तीच्या टेस्ट करून रिपोर्ट पाठवा सांगितले. सुदैवाने ते सगळे रिपोर्ट नॉर्मल आले.

सुरवातीला जानेवारी २०२५ मध्ये १५ दिवस औषध घेतले त्यानंतर औषध बंद करून डॉ दीक्षित जीवनशैली चे पालन सुरू केले रोज सकाळी ६.०० कि.मी. धावणे आणि २ वेळा जेवण सुरू केले त्यामुळे उत्साह वाढला वजन आणि पोटाचा घेराव कमी झाला. तसेच एचबीएवनसी आणि उपाशीपोटी इन्सुलिन कमी होऊन मी मधुमेह मुक्त झालो याचा मला आनंद होतो आहे .
डॉ दीक्षित जीवनशैली चे पालन मी कायम स्वरूपी चालू ठेवणार आहे. तसेच याचा प्रचार आणि प्रसार नक्कीच चालू राहील.
मी नियमित येणारे डॉ दीक्षित यांचे video पाहतो. त्यामुळे आहार आणि व्यायाम करताना काही चुकीचे होत असेल तर समजते आणि त्याप्रमाणे सुधारणा करतो.
डॉ दीक्षित जीवनशैली चे पालन करण्यासाठी मला सौ कविता मेहेंदळे मॅडम यांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करून माझा उत्साह वाढवला. त्यामुळे हे फॉलो करणे सर्व शक्य झाले आणि मी मधुमेह मुक्त झालो.
यासाठी मी डॉ दीक्षित सर आणि त्यांच्या सह समन्वयक यांचा अत्यंत आभारी आहे.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts