गेल्या ३१ वर्षांपासून सर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहेत.
सध्या ते बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे जन औषधवैद्यक शास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांना आरोग्य शिक्षणातील भरीव कामासाठी ३ राष्ट्रीय व ५ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने २०१५-२०१६ सालचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना गौरवले आहे.
त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी २, परिचर्या विद्यार्थ्यांसाठी १ तर सर्वसामान्य लोकांसाठी २० पुस्तके लिहिली आहेत.
ते स्वेच्छा रक्तदानाच्या चळवळीत कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत ५० हुन अधिक वेळा रक्तदान केले आहे.
त्यांनी WHO, UNICEF अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्थानसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे.
त्यांचे ५५ शोधनिबंध विविध वैद्यकीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत.
कै.डॉ.श्रीकांत जिचकार यांच्या पासून प्रेरणा घेऊन त्यांनी ‘स्थूलत्व व मधुमेहमुक्त विश्व’ अभियान सुरू केले आहे.
Whatsapp, telegram व facebook अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून या अभियानाशी ४१ देशातील लाखो लोक प्रत्यक्ष जोडले गेले आहेत.
सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या विषयावर ५०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत.
दीक्षित सरांची या विषयावरील मराठी, हिंदी, कन्नड व इंग्रजी भाषेतील व्याख्याने YouTube वर अतिशय लोकप्रिय असून ती लाखो लोकांनी पाहिली आहेत.
महाराष्ट्र सरकारने ‘Fight obesity’ मोहिमेसाठी सदिच्छा दूत म्हणून २०१८ मध्ये त्यांची नियुक्ती केली आहे.
सर्व विश्व स्थुलत्व आणि मधुमेह मुक्त व्हावे या ध्येय प्राप्ती साठी त्यांनी ‘असोसिएशन फॉर डायबेटिस अँड ओबेसिटी रिव्हर्सल’ अर्थात अडो र या धर्मादाय संस्थेची स्थापना केली असून ते तिचे अध्यक्ष आहेत.
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पंतप्रधान कार्यालय, विशेष सुरक्षा बल आणि खासदार यांच्यासाठी ‘Fit India ‘ अभियाना अंतर्गत व्याख्याने देण्यासाठी त्यांना डिसेंबर २०१९ मध्ये आमंत्रित केले होते.