यशोगाथा : Dhanaji Bandal
परिचय पत्र
नाव: धनाजी बांदल
वय: ४२ वर्षे
उंची: १६५ सेंमी
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ७७१९९५१५५१
माझी परिवर्तन कथा
मला सप्टेंबर २०२३ मध्ये तोंड कोरडे होणे या समस्येची जाणिव झाली. त्यावेळेस डॉक्टरांनी शुगर टेस्ट करण्यास सांगितले. टेस्ट केली असता एचबीएवनसी ८.२ आले. मला धक्काच बसला. यू ट्यूबवरची डॉ. दीक्षित यांची व्याख्याने ऐकली व लगेचच DRC पुणे येथे जाण्याचा निर्णय घेतला. सेंटरमध्ये माझी डॉ. दीक्षित यांचेशी प्रत्यक्ष भेट झाली. त्यांनी मला जीवनपद्धती अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितली. मी लगेचच दुसऱ्या दिवसापासून दोन वेळा जेवणे व ८ कि.मी. चालणे सुरु केले.
तीन महिन्यातच माझे एचबीएवनसी ८.२ वरुन ५.९% इतके झाले व वजन ७ कि. कमी झाले. माझ्या कमरेचा घेर पण कमी झाला. मला खूपच आनंद झाला.
मला झालेल्या फायद्यामुळे आणि समाधानामुळे मी सर्व टीम व डॉ दीक्षित सरांचे खूप खूप आभार मानतो. मी आता मधुमेही पासून पूर्व-मधुमेही झालो आहे. या पुढे मी मधुमेह-मुक्त्त होण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या सर्व मित्रांना, नातलगांना या जीवनशैलीमुळे झालेल्या उचित बदलांबद्दल सांगणार आहे.
आता वजन कमी करणे व डायबेटीस मुक्त्त जीवन जगणे हे माझे ध्येय आहे.
(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

