यशोगाथा 4: तारीख 6 एप्रिल 2022

0

यशोगाथा 4: तारीख 6 एप्रिल 2022

परिचय पत्र

नाव: कुसुम फुटाणे*
वय: ६५ वर्ष*
उंची: १५० सेंमी*
वास्तव्य: डोम्बिवली*
व्यवसाय: गृहिणी*
मोबाइल: ९०२९१४६१६६*

माझी परिवर्तन कथा

सन २०२१ च्या मार्च महिन्यात मला मधुमेह झाल्याचे समजले. त्यावेळेस माझे एचबीएवनसी १२.८ होते. माझ्या जावयांना *डॉ दीक्षित* आहार योजनेबद्दल माहिती होती. मग आम्ही *डॉ दीक्षित* यांचेशी संपर्क केला. माझ्या रिपोर्ट्स बघून त्यांनी मला सी पेप्टाइड टेस्ट करायला सांगितली. त्याचे अहवाल बघून त्यांनी मला या जीवन शैली बद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानुसार मी ०५-०४-२०२१ पासून ही आहार योजना सुरु केली. मी रोज सकाळी उठून एका तासात ५ किलोमीटर पायी चालते. मी सकाळी १२:३० ला तर संध्याकाळी ८ वाजता जेवते. दोन्ही जेवणात मी सुके मेवे, सलाड, मोड आलेले धान्य/अंडी/चिकन आणि त्यानंतर घरी शिजवलेले बाकीचे अन्न पदार्थ खाते. पूर्वी मी दोन जेवणाच्या मध्ये पातळ ताक प्यायचे पण नंतर ते ही बंद केले.

*डॉ जगन्नाथ दीक्षितांच्या* या जीवन शैलीचे एक वर्ष पालन केल्यावर माझे एचबीएवनसी ५.५% झाले. आता मला खूपच निरोगी आणि तरतरीत झाल्यासारखे वाटते . मी ही जीवन शैली आता आयुष्यभर करणार आहे. माझ्या सर्व रक्त परीक्षणांचे अहवाल सोबत च्या तक्त्यात दिले आहेत.
माझ्या मधुमेहाला पळवून लावल्याबद्दल मी *डॉ दीक्षित* यांचे मनापासून आभार मानते. मी याबद्दल माझे सर्व नातेवाईक व मित्र यांना सांगत असते. शेवटी मला एव्हढेच सांगायचे आहे कि *डॉ दीक्षित* एक देवदूत आहेत आणि देव त्यांचे भले करो.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts