यशोगाथा 24: तारीख: 17 फेब्रुवारी

0

यशोगाथा 24: तारीख: 17 फेब्रुवारी

परिचय पत्र

नाव: मधुकर मातोंडकर*
वय: ५५ वर्षे*
ऊंची: १६८ सेंमी*
व्यवसाय: नोकरी*
वास्तव्य: सावंतवाडी*
भ्रमणध्वनी: ९४२३५१३०७२*

माझी परिवर्तन कथा

मी कोकण रेल्वेत सेवेत आहे. अत्यावश्यक सेवा असल्याने सतत कामाचे दडपण असतेच. आमचे मित्र प्रकाश चव्हाण भेटले की *डॉ दीक्षित जीवनशैली* बाबत सांगायचे, पण मी कधीच गंभीरतेने घेतले नाही. मला कोणताही आजार नव्हता. माझे वजन उंचीच्या तुलनेत बरोबर होते. मात्र तरी पोटाचा घेर थोडा जास्त होता.
मला ऍसिडिटीचा व पित्ताचा त्रास जाणवत होता आणि थोडे अस्वस्थ वाटत असे. दिवसातून पाच सहा वेळा चहा व्हायचा. तसेच दोन वेळा नाश्ता व दोन वेळा जेवण असा नेहमीचा शिरस्ता होता.
साधारण चार महिन्यापूर्वी डॉक्टरांजवळ जाऊन तपासणी केली. रक्त चाचणी केली असता साखरेची पातळी वाढली असल्याचे डॉक्टरनी सांगितले आणि मला डायबेटीस असल्याची कल्पना दिली . डॉक्टरने डायबेटीसच्या दोन प्रकारच्या गोळ्या सुद्धा लिहून दिल्या. आता कायमच्या गोळ्या खाव्या लागणार ह्या विचाराने अस्वस्थता वाढली.

*डॉ दीक्षित सरांनी* कुडाळ मध्ये मोफत जीवनशैली सल्ला केंद्र सुरु केले, हे वर्तमानपत्रात वाचले होते. या सल्ला केंद्राचे समन्वयक इंजि. प्रकाश चव्हाण सरांची सल्ला केंद्रात जावून भेट घेतली आणि *डॉ. दीक्षित सरांच्या* जीवनशैली बाबत मार्गदर्शन घेतले. प्रकाश चव्हाण सरांच्या सूचनांनुसार २३-०३-२०२१ रोजी रक्त चाचण्या करवून घेतल्या ज्यात माझे एचबीएवनसी ६.९% व उपाशीपोटी इन्सुलिन ७.२० आले. अर्थात् मी मधुमेही आहे असे निदान झाले . त्यावेळेस माझे वजन ६६ किलो आणि पोटाचा घेर ८६ सेंमी होता. त्याच दिवसापासून मी ही आहार योजना सुरु केली.
मी फक्त दोन वेळा जेवण आणि ४५ मिनिटात ४.५ किलोमिटर चालणे नियमित चालू केले. मी या सरावा मध्ये कोणताही व्यत्यय येऊ दिला नाही. आजपर्यंत मी या आहारशैलीचे काटेकोरपणे पालन करीत आहे. प्रकाश चव्हाण सरांनी मला दर महिन्याला रक्ताच्या चाचण्या घेण्यास सांगितले होते.
माझ्या २८-०९-२०२१ च्या रक्त परिक्षणात माझे एचबीएवनसी ५.४% व उपाशीपोटी इन्सुलिन ४.८ आले . हे पाहून प्रकाश चव्हाण सर खूप आंनदित झाले. ते म्हणाले कि या सल्ला केंद्रा मधून मधुमेह मुक्त होणारे तुम्ही पहिले रुग्ण आहात. माझ्या सर्व रक्त परीक्षणांचे अहवाल सोबतच्या तक्त्यात दिलेले आहेत.
*डॅा दीक्षित* सरांची जीवनशैली, त्यांचे व त्यांच्या सर्व टीमचे मार्गदर्शन यामुळे मला मधुमेह मुक्त होणे शक्य झाले आहे. मी सर्वांचा आभारी आहे.
मी आयुष्यभर या जीवनशैलीचे काटेकोरपणे पालन करुन मधुमेह मुक्त राहणार आहे व या जीवनशैलीच्या प्रचार व प्रसारासाठी ही काम करणार आहे.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts