यशोगाथा 23: तारीख 20 फेब्रुवारी 2022
परिचय पत्र
नाव: राजन व्ही नायडू*
वय: ६३ वर्षे*
उंची: १७५ सेमी*
व्यवसाय: सेवानिवृत्त*
वास्तव्य: रायगड*
समूह: ०४ डीएम आरइव्ही*
मोबाईल: ९२७००१२५७१*
माझी परिवर्तन कथा
मी बऱ्याच वर्षापासून मधुमेही होतो. माझे वजन देखील प्रमाणाबाहेर वाढले होते. *डॉ दीक्षित* यांचे व्याख्यान मी युट्युब वर ऐकले तेंव्हा मला *डॉ दीक्षित* जीवनशैलीबद्दल माहिती मिळाली.
मी लगेच २७ ऑगस्ट २०२१ पासून ही जीवनशैली अमलात आणली. माझ्या जेवणाच्या वेळा सकाळी १०:०० आणि संध्याकाळी ६:०० अशा मी निश्चित केल्या. सुरुवातीला ही आहार पद्धती मला जरा त्रासदायक वाटली कारण दिवसातून अनेक वेळा खाण्याची आणि चहा घेण्याची मला सवय होती. १० दिवसानंतर मात्र सर्व सुरळीत झाले मी रोज १ तासात ६ किमी पायी फिरून येतो ४० मिनिटे स्ट्रेचिंग चा व्यायाम करतो. आता मला खूप ताजेतवाने आणि उत्साही वाटते. माझा मधुमेहाच्या औषधांचा डोस आता ५०% कमी झाला आहे मी ही आहार पद्धती सुरू केल्यापासून, तिचे पालन करण्यात काहीवेळा माझ्याकडून हयगय झाली पण मी ही आहार पद्धती काटेकोरपणे पाळावी यासाठी माझी पत्नी सातत्याने प्रयत्नशील असते. त्यासाठी ती मला सर्वप्रकारे मदत करते. मला मिळालेले यश पाहून माझे मित्र आणि नातेवाईक खूप प्रभावित झाले. यापैकी बरेच जण या समुहात सामील होण्यासाठी उत्सुक आहेत. मी या आहार पद्धतीचे जीवनभर पालन करीन असा मी निर्धार केला आहे.
*डॉ दीक्षित सर*, डॉ रत्ना, दामले सर आणि संपूर्ण टीमला मी मनःपूर्वक धन्यवाद देतो.