यशोगाथा 22 तारीख: 21 फेब्रुवारी 2022
परिचय पत्र
नाव: सुदाम बनकर*
वय: ५७ वर्ष*
उंची: १६७ सेंमी*
व्यवसाय: शेती व उद्योग*
वास्तव्य: अहमदनगर*
समूह: ०१-डी एम REV*
मोबाइल: ९८५०२९५३२१*
माझी परिवर्तन कथा
मला १९९८ पासून मधुमेह आहे. माझ्या आईला मधुमेह होता त्यामुळे मला मधुमेह होणार हे आमच्या डॉक्टरांनी आधीच सांगितले होते . म्हणून मी दरवर्षी तपासणी करायचो. १९९८ मध्ये तो शेवटी झालाच.
मला *डॉ दीक्षित जीवन शैलीची* माहिती मिळाल्यावर मी २०१९-२० मध्ये ती सुरु करायचा प्रयत्न केला पण अनेकदा करून ही त्यात सातत्य टिकवून ठेवू शकलो नाही . मग मी त्यांचे यूट्यूब वरील सर्व विडियो पाहिले व ती पालन करण्याचा निर्धार केला. मी १ जुलै २०२१ पासून मी *डॉ दीक्षित* आहार योजनेची सुरुवात केली. मी माझे रक्त परीक्षण करवून घेतले व त्यांचे अहवाल *डॉ दीक्षित सरांना* पाठवले. त्यांनी फोनवर माझ्याकडून माहिती घेतली व मला डॉ सुहासिनी देशपांडे मॅडमशी संपर्क करायला सांगितला. त्यांनी लगेचच मला एका समूहात सामील करून घेतले.
मी सकाळी १२ वाजता व संध्याकाळी ८ वाजता जेवतो. सकाळच्या जेवणात मी आधी २ काजू, ३ बदाम, २ अक्रोड, खातो व नंतर मोड आलेले कडधान्य, सॅलॅड, पोळी, भाजी, वरण इ. खातो. संध्याकाळी शेंगदाणे, भाजी व पोळी खातो. त्यानंतर एक चमचा साजूक तूप व हळद घातलेले दूध पितो. मी रोज सकाळी आधी थोड़ा व्यायाम करून मग १५ किलो मीटर सायकल चालवतो व नंतर प्राणायाम करतो.
ही आहार योजना सुरु करण्यापूर्वी मला अनेक औषधे खावी लागत होतीव इन्सुलिन सुद्धा घ्यावे लागत होते. आता माझी अर्ध्यापेक्षाही अधिक औषधे बंद झाली आहेत. माझे वजन ७ किलोने कमी झाले आहे. आता मला खूपच ताजेतवाने वाटते. माझ्या रक्त परिक्षणांचे अहवाल सोबतच्या तक्त्यात दिलेले आहेत.
मी *डॉ दीक्षित सरांचा* मनापासून आभारी आहे. तसेच सुहासिनी देशपांडे मॅडमचे ही मी आभार मानतो.