यशोगाथा 20: तारीख: 27 फेब्रुवारी 2022
परिचय पत्र
नाव: सौ अर्चना मिलिंद कुलकर्णी*
वय: ४७ वर्षे*
उंची: १५० सेंमी*
व्यवसाय-गृहिणी*
निवास : ठाणे, महाराष्ट्र*
गट: ०४-डीएम- रेव्ह*
मोबाईल क्रमांक: ९९२०५६२६५७*
माझी परिवर्तन कथा
माझ्या ३ शल्य प्रसूतींनंतर माझे वजन खूप वाढले होते. मी योग, व्यायामशाळा, चालणे, आहार योजना इत्यादींचे अनुसरण करून माझे वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला. माझे वजन २.५ किलो ते ३ किलो कमी झाले आणि त्यानंतर ते स्थिर झाले. त्यानंतर माझे गुडघे दुखू लागले. लॉकडाऊन दरम्यान गुडघेदुखी आणि त्यांची सूज वाढली. त्या क्षणी मी ठरवलं की काहीतरी वेगळं करावे लागेल.
युट्युब चित्रफिती सहजपणे चाळत असताना मला *डॉ दीक्षित* यांचा आहार योजनेवरची चित्रफीत आढळून आली. मी व्याख्यानाची चित्रफीत पाहिली. पण चित्रफीतीतून पहिल्यांदा मला काहीच समजले नाही. मग संकल्पना समजून घेण्यासाठी मी सर्व चित्रफीती पुन्हा पुन्हा पाहिले.
मला समाज माध्यमातून श्री दिनकर दामले सरांचा संपर्क क्रमांक मिळाला ज्यांनी मला ०४ डीएम रेव समुहामध्ये समाविष्ट केले. मी दररोज ५ ते ५.५ किमी चालते आणि एकदिवस आड दिवशी व्यायाम करते. मी दररोज गुडघ्यांसाठी शिफारस केलेल्या व्यायामाचा सराव करते. मी गेल्या १० महिन्यांपासून हा दिनक्रम पाळत आले आहे. आधी ह्याचा कंटाळा यायचा पण आता हे आयुष्याचा भाग झालय.
मी दुपारचे जेवण ११.१५ वाजता आणि रात्रीचे जेवण ७.१५ वाजता करते. मी नेहमीच दिवसातून २ जेवण या तत्त्वाचे पालन केले आहे.
माझे दुपारचे जेवण २ अक्रोड, ६-७ बदाम, ३-४ काजू, मोड आलेली कडधान्य, भरपूर कोशिंबीरी ने सुरू होते. मग अर्धी भाकरी किंवा १ चपाती, १ वाटी डाळ, १ वाटी भाजी, शेंगदाण्याची चटणी हा माझा दिनक्रम आहे. मी दोन जेवणादरम्यान किंवा कधीकधी कोरा चहा किंवा ग्रीन टी घेते तसेच भरपूर पाणी पिते. रात्रीच्या जेवणासाठी हाच दिनक्रम पाळला जातो.
क्वचितच, नित्यक्रमात बदल घडवून आणण्यासाठी मी भरपूर भाज्या घालून ओट्स शिजवते किंवा कधी कधी सूप पिते. हे आहार पालन केल्यानंतर मी स्वतःला पुन्हा शोधू शकले.
मी माझा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवला. आता मी सर्व कामांमध्ये मोठ्या ऊर्जेने आणि उत्साहाने सहभागी होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी आता माझे जुने कपडे घालू शकते.
*डॉ जगन्नाथ दीक्षित सर*, श्री. दिनकर दामले सर, यांची मला आत्मशोधात मदत केल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे.