यशोगाथा 21: तारीख: 25 फेब्रुवारी 2022
परिचय पत्र
नाव: ज्ञानेश्वर पाटील*
वय: ४८ वर्ष*
उंची: १७१ सेंमी*
व्यवसाय: प्राथमिक शिक्षक*
वास्तव्य: तलासरी, पालघर*
मोबाइल: ९०२८२६२५९६*
माझी परिवर्तन कथा
मी ऑक्टोबर २०२१ मध्ये रक्त परीक्षण केली असता माझे एचबीएवनसी ७.०० आले अर्थात मी मधुमेही होतो . पत्नीच्या आग्रहाखातर मी एका मोठ्या डॉक्टरांना दाखवले. त्यांनी माझ्या खाण्यावर बंधने आणली आणि मला औषधे ही लिहून दिली. पण मला औषधे खावून जगायचे नव्हते . मग मी घरच्यांना तीन महिन्यांचा वेळ मागून घेतला. मला *डॉ दीक्षित* जीवन शैलीबद्दल माहिती होती पण योग्य मार्गदर्शन नव्हते. यूट्यूब वरील सरांची भाषणे पाहताना राजीव भालेराव सरांचा संपर्क क्रमांक मिळाला. त्याना फोन केल्यावर त्यांनी मला पूर्ण माहिती दिली. मी त्यांच्या सूचनेनुसार रक्त परीक्षण सुद्धा करून घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही आहार योजना सुरु केली.
मी रोज सकाळी ९:३० वाजता आणि रात्री ८-८:३० वाजता जेवतो. सकाळच्या जेवणात ३ काजू, ३ बदाम, ३ पिस्ते,
नंतर सलाड, मोड आलेले धान्य, किंवा दोन उकडलेली अंडी , वरण, भात, पोळी, भाजी इ. खातो. रात्रीच्या जेवणात भाजलेले शेंगदाणे, सलाड व इतर नेहेमीचे जेवण करतो. मी जेवणात सर्व काही खातो. मी रोज एक तास भरभर चालतो आणि एका दिवसाआड संध्याकाळी एक तास सायकलिंग करतो. माझ्या व्यायामात गेल्या अनेक महिन्यात फक्त पाच दिवस खंड पडला आहे. पूर्वी मला दोन मजले चढताना थकवा यायचा पण आता मी गड किल्ले सुद्धा सहज सर करतो. मी आतापर्यंत महालक्ष्मीगड, आशेरीगड, साल्हेरगड, शिवनेरी इ ट्रेक पूर्ण केले आहेत. मी तलासरी ते महालक्ष्मी सायकलीने ३:३० तासात जावून परत आलो आहे.
या प्रवासात मला माझ्या कुटुंबाची मोलाची साथ मिळाली आहे. आता मी ही जीवन शैली आयुष्यभर सुरु ठेवणार आहे. *डॉ दीक्षित* जीवनशैली म्हणजे दिवसातून दोन वेळा ५५ मिनिटात हवे ते खाण्याचे स्वातंत्र्य!!
मी *डॉ दीक्षित*, श्री राजीव भालेराव व त्यांच्या सहकार्यांचा मनापासून आभारी आहे.