यशोगाथा 2: तारीख: 11 एप्रिल 2022
परिचय पत्र
नाम: प्रसाद जोगळेकर*
वय: ३५ वर्ष*
उंची: १७० सेमी*
व्यवसाय: पौरोहित्य*
वास्तव्य: मुंबई*
समूह: Dr. Dixit diet 03 DM rev*
मोबाइल: ९८६९२१५१२८*
माझी परिवर्तन कथा
आपण सर्व सानंद आचरण करत असलेल्या या *डॉ दीक्षित* जीवनशैलीचे उत्तम परिणाम मिळणे आणि त्यासाठी लागणारे अल्प श्रम करणे हे समीकरण म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील.
ही प्रस्तावना अशासाठी की गेल्या तीन महिन्यांपासून माझ्या आयुष्यात घडत असलेल्या उत्तम शारीरिक बदलांसाठी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आधीचे व आत्ताचे आयुष्य यात होत चाललेला बदल हा खूप सकारात्मक आहे हे प्रकर्षाने जाणवते आहे.
एखादी गोष्ट जेव्हा विज्ञानाच्या पातळीवर सिद्ध होते तेव्हा तिचे आचरण करण्यासाठी स्वतःला झोकून देणे ही तितकेच आवश्यक आहे, मग त्यातून जो चांगला परिणाम साध्य होऊ शकतो तो सहजगत्या प्राप्त होतो.
खरेतर मला *डॉ दीक्षित* यांची ही जीवनशैली साधारण २ वर्षे आधी समजली होती, पण *डॉ दीक्षित* जीवनशैलीचे इतके शुद्ध सोने हाती येऊनही त्याचा प्रत्यक्ष उपयोग करून घेण्यास मला हे वर्ष आणि जानेवारी मास यावा लागला.
आपल्या उपक्रमात सांगितल्याप्रमाणे दिनांक ५ जानेवारीला एचबीएवनसी ची चाचणी केली आणि त्याचे प्रतिवृत्त आल्यावर क्षणभर स्तब्ध व्हायला झाले…कारण मला मधुमेह झाल्याचे निदान झाले असून त्यात तो अंक ०७.००% इतका पुढे पोहोचला.
आता मात्र जर ही जीवनशैली आचारली नाही तर आपल्या जीवनाचे आणि आरोग्यपूर्ण आयुष्याच्या विपरीत आपला उलटा प्रवास सुरु होईल की काय आणि त्यातून येणाऱ्या अडचणी काय येऊ शकतील याची माहिती *डॉ दीक्षित* यांच्या व्याख्यानातून ऐकलेली होती, त्या सर्व गोष्टींचे डोक्यात काहूर माजले आणि गोरेगाव प्रभाग प्रमुख श्री अरुण नावगे यांची भेट घेतली त्यांनी यात आतातरी संपूर्ण सातत्य राखणेबाबत आवश्यक सूचना केल्या काही शंकांचे निराकरण देखील केले तसेच Dr. Dixit diet 03 DM rev या गटात तात्काळ समाविष्ट केलें.
मग मात्र केवळ दोन वेळेसच अन्न ग्रहण करणे आणि त्याच सोबत रोज एका तासात ५.५ किमी चालणे, व गेल्या महिनाभरापासून १०-१२ किमी सायकल चालविणे असे व्यायामप्रकार अखंड सुरू केले. मी माझ्या जेवणात गोड पदार्थांची मात्रा शक्य तितकी कमी केली.
दिनांक ५-४-२०२२ ला तीन महिने पूर्ण झाल्यावर एचबीएवनसी आणि फास्टिंग इन्शुलिन या दोन्ही रक्त चाचण्या केल्या, तर त्यात में पूर्व मधुमेही झाल्याचे समजले . माझ्या दोन्ही रक्त परीक्षणांचे अहवाल सोबत च्या तक्त्यात दिलेले आहेत.
आता यापुढे माझी दोन ध्येय म्हणजे पहिले संपूर्ण मधुमेह मुक्त होणे आणि वजन आणि उंची यांचा मेळ बसविणेसाठी अनावश्यक मेद कमी करणे…
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, श्रीमान् अरुण नावगे आणि आपले सर्वसर्वा आणि प्रधान मार्गदर्शक *डॉ जगन्नाथ दीक्षित* यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद यामुळे माझी ही दोन्ही ध्येय साध्य होऊन हाती घेतलेले हे जगन्नाथाचे व्रत अखंडित परिपूर्ण होवो ही प्रार्थना.