यशोगाथा 18: तारीख: 5 मार्च 2022

0

यशोगाथा 18: तारीख: 5 मार्च 2022

परिचय पत्र

नाव: देवेंद्र जामसिंग पाटील*
वय: ३३ वर्षे*
उंची: १७२ सेमी*
व्यवसाय: नोकरी (प्राथमिक शिक्षक)*
वास्तव्य: चाळीसगाव, जिल्हा जळगाव
समूह: एकलव्य (डॉ. दीक्षित फॅन्स क्लब)*
मोबाईल: ९९२१०८००८१*

माझी परिवर्तन कथा

हा ग्रुप जॉइन करण्याआधी माझे वजन दिनांक २४/०९/२०२१ रोजी ९० किलो होते आता माझे वजन ७२ किलो आहे. माझ्या गेल्या तीन ते चार महिन्याच्या प्रवास मी आपणासोबत आज शेयर करू इच्छितो
२४/०९/२०२१ ते २४/१२/२०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीत माझे वजन १६ किलो कमी झाले आणि या महिन्यात २ किलो असे एकूण १८ किलो वजन कमी झाले. मी २०१८ मध्ये आदरणीय *डॉक्टर दीक्षित* सरांचे व्याखान ऐकले होते व सर्व चाचण्या करून ईडब्ल्यूएस १३ या ग्रुप मध्ये जॉईन झालो होतो. त्यावेळी देखील मी माझे १४ किलो वजन सरांनी सांगितलेल्या आहार योजना व व्यायामामुळे कमी केले होते.

करोना कालावधीत लॉकडाउन मध्ये माझी आहार योजना व व्यायाम जवळपास दोन ते अडीच वर्षापासून बंद होते. मी खाण्याचा खूप शौकीन असल्यामुळे काही ना काही खातच असायचो त्यामुळे वजन दिवसेंदिवस वाढत चालले होते. सर्व कळत होतं परंतु वळत नव्हत. लॉक डाऊन च्या काळात माझे वजन जवळपास १६ ते १८ किलो पुन्हा वाढले होते व पुन्हा नव्याने या आहार योजनेची सुरुवात करावी अस ठरवायचो परंतु एक ते दोन दिवस केलं त्यानंतर पुन्हा जैसे थे व्हायचे. कुणी काही आग्रह केला खाण्याचा तर नाही म्हणू शकत नव्हतो. दरम्यान प्रवास पण खूप वाढला होता, मग जे मिळेल ते खात होतो आणि व्यायाम पूर्ण पणे बंद होता.
एक दिवस फेसबुक वर श्री. सुनील पवार सर यांची सक्सेस स्टोरी वाचली, त्यांचे फोटो बघितले, १०५ किलो ते ७७ किलो पर्यंतचा त्यांचा प्रवास बघून जणू मला किकच बसली मग मी त्यांच्याशी संपर्क साधला व त्यांचा प्रवास जाणून घेतला व मला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यास विनंती केली व त्यांनी वेळो वेळी सहकार्य देखील केले व मला *डॉ दीक्षित सर* फॅन्स ग्रुप मध्ये ऍड केले. प्रत्येक जण नियमित व्यायाम करत होता आणि आपली गतिविधी शेयर करत होते. सुरुवातीला मी एक किलोमीटर ही धावू शकत नव्हतो, खूप त्रास होत होता व गुडघे खुप दुखायचे. अक्षरशः पहिल्या ८ ते १० दिवसात पायाला बूट वापरून देखील फोड आले होती परंतु मनाशी पक्का निश्चय केला की आता थांबायचे नाही. हळू हळू सराव वाढवला मग ग्रुप मधील सदस्य सुनील सर, पाटील सर यांच्याशी अडचण आल्यास संपर्क केला व अडचणी सोडवल्यात. मी माझा व्यायाम व व आहार योजना नियमित सुरू ठेवला व त्याचे फलित ३ महिन्याच्या आताच मी माझे १६ किलो च्या आसपास वजन कमी केले. यासाठी मी आदरणीय *डॉ दीक्षित* सरांचे मनापासून आभार मानतो की ज्यांनी इतकी सर्वात सोपी सहज आणि विनाखर्चिक आहार योजना आज जगासमोर आणली. माझे जे काही व्हाट्सअप ग्रुप असतील त्यामधील हा अतिशय महत्वाचा ग्रुप मी समजतो की ज्यामुळे माझं जीवन बदलले आहे. ग्रुपमधील नम्रता मॅडम यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा त्यांचा प्रवास एकूण तर मी थक्कच झालो. खरोखर इतकी प्रेरणादायी लोक सोबत असल्यामुळेच आणि आपल्या ह्या ग्रुप मधील सर्वांमुळेच मला हे शक्य झाले नाहीतर वजन कमी करणे हे मला अशक्य आणि स्वप्नच वाटत होतं. आता भविष्यात ही आहार योजना व व्यायाम कायम स्वरूपी चालू ठेवणारं आहे, अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पुनश्च एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts