यशोगाथा 17: तारीख: 8 मार्च 2022
परिचय पत्र
नाव: सोनाली शिंदे*
वय: ४० वर्षे*
उंची : १५४ सेमी*
व्यवसाय: डॉक्टर*
वास्तव्य: पुणे*
समूह: प्रिडायबिटिक*
माझी परिवर्तन कथा
बैठे व्यवसाय तसेच गरोदरपणातील संपूर्ण बेड रेस्ट, डिलिव्हरी यामुळे वजन वाढत चालले होते. यापूर्वीही मी डायटीशियन च्या सल्ल्याने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला फारसे यश आले नाही. तसेच त्यांची फीस खूप जास्त असते. यापूर्वी मी *डॉ दीक्षित* सरांचे व्हिडिओ युट्युब वर पाहिले होते. त्यामुळे मी त्यांचा डायट प्लांन सुरू करण्याचे ठरविले. त्यांच्या वेबसाईटवरून डॉ. संतोष ढुमणे सरांशी संपर्क केला. त्यावेळी त्यांनी मला फास्टिंग इन्सुलिन आणि एचबीए१सी या दोन टेस्ट करण्यास सांगितले. त्यानुसार मी प्रिडायबेटीक गटात येत होते. व त्यानंतर मी हा डायट प्लॅन सुरू केला.
मी दररोज दुपारी एक वाजता व रात्री नऊच्या दरम्यान जेवण करते. तसेच दोन्ही जेवणाच्या मध्ये पाण्याशिवाय काहीही घेत नाही. सकाळच्या जेवणात सॅलड , मोड आलेली कडधान्य अर्धी भाकरी व भरपूर प्रमाणात पातळभाजी व सुकी भाजी घेते. तसेच रात्रीच्या जेवणात सॅलड अर्धी भाकरी किंवा अर्धी चपाती आणि भरपूर प्रमाणात पातळ व सुकी भाजी घेते. तसेच अधून मधून जेवणात अंडे , मटन , पनीर आणि ड्रायफ्रूट्स समावेश असतो. तसेच भाताचे प्रमाण खूप कमी केले आहे. कधीकधी बिर्याणी आवडत असल्यामुळे बिर्याणी ही खाते पण त्यात खूप सॅलडचा समावेश करते.
दररोज सकाळी मी फक्त अर्धा तास च व्यायाम करते. खरं सांगायचं म्हणजे, ४५ मिनिटे व्यायाम मी अजून एकदाही केला नाही. कदाचित ४५ मिनिटे व्यायाम केला असता तर अधिक फायदा झाला असता. हा व्यायाम मी वॉक ऐट होम या यूट्यूब चैनल वरील व्हिडिओ पाहून करते. तरी या डायटचा खूप छान फायदा मला झाला आहे. मुख्य म्हणजे माझा पोटाचा घेर कमी होण्यास मदत झाली आहे. हया संपुर्ण डायट प्लान मध्ये मी दोन वेळा जेवण याचे पथ्य ९९% पाळले आहे, आणि खूप छान प्रकारे फायदा मला मिळाला आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे.
*डॉ जगन्नाथ दीक्षित सर*, डॉ.संतोष ढुमणे सर आणि सर्व टीम यांची मी खूप खूप आभारी आहे. ह्या डायट प्लान चे मी नक्कीच पूर्ण आयुष्यभर पालन करणार आहे आणि माझ्या पेशंटला याची माहिती देत राहणार आहे.