यशोगाथा 14:
परिचय पत्र
नाव: वैभव कोटलापुरे*
वय: ४८ वर्षे*
उंची: १६८ सेंमी*
व्यवसाय: व्यापार
निवासस्थान: ठाणे*
मोबाईल: ९८३३३१४७०१*
माझी परिवर्तन कथा
मी पूर्वीपासून रोज चार ते पांच कप चहा प्यायचो आणि भरपूर मिठाई खात होतो. आताही मला आठवड्यातून जवळपास पाच दिवस प्रवास करावा लागतो आणि बाहेरचे अन्न खावे लागते.
एप्रिल २०२१ मध्ये माझे वजन १०७ किलो होते, परंतु जूनमध्ये माझे वजन कमी होत आहे आणि कपडे सैल होत असल्याचे निदर्शनास आले. पण मी माझी जीवनशैली चालू ठेवली. जुलैच्या मध्यात मी माझे वजन तपासले ते १०७ वरून ९८ किलो पर्यंत कमी झाले, मग मी घाबरलो आणि विचार करू लागलो. २४ जुलै रोजी मी माझी रक्त तपासणी केली आणि माझी सरासरी उपाशीपोटी रक्त शर्करा ३८५ आणि एचबीएवनसी १५% होती. हे पाहून मला धक्का बसला. मी २९ जुलैला पुन्हा रक्ताची चाचणी केली आणि मला तेच परिणाम आढळले.
दोन वर्षांपूर्वी मी *डॉ दीक्षित आहार योजनेचे* पालन केले होते आणि मला मधुमेहाच्या परावर्तनाबद्दल माहिती होती. म्हणून मी डॉक्टरांना भेट न देण्याचा आणि आयुष्यभर औषध न घेण्याचा माझा विचार पक्का केला. २ ऑगस्ट २०२१ पासून *डॉ दीक्षित आहार योजना* नियमितपणे सुरू झाली. माझे रोजचे व्यायामाचे वेळापत्रक म्हणजे एका तासात ६ किमी चालणे . माझे पहिले जेवण सकाळी ०९:३० वाजता असते ज्यात सुके मेवे, सलाद, अंकुरित धान्ये, ज्वारीची भाकरी आणि भाजी असते. दुसरे जेवण संध्याकाळी ७:३० वाजता असते ज्यात आहार तोच असतो. मी साखर, फळं, भात खाणे बंद केले. मी दोन जेवणांच्या दरम्यान फक्त पाणी पितो.
आज मी *डॉ दीक्षित आहार योजनेचे* सात महिने पूर्ण केले आहेत आणि मला कळवण्यात आनंद होतो की माझी सरासरी उपाशीपोटी रक्तशर्करा १०८ आहे आणि एचबीएवनसी ५.४% आहे.
मला मदत, प्रेरणा आणि नियमित मार्गदर्शन केल्याबद्दल मी *डॉक्टर जगन्नाथ दीक्षित* यांचा आभारी आहे. *डॉ. दीक्षित* यांनी सुरु केलेली मोहीम खरोखरच समाजासाठी उपयुक्त आहे. मला त्याचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो. मी या आहाराचे कायम पालन करीन आणि इतरांनाही असे करण्यास प्रोत्साहित करेन.