यशोगाथा 11: तारीख: 25 मार्च 2022

0

यशोगाथा 11: तारीख: 25 मार्च 2022

परिचय पत्र

नाव: अमोल हाके
वय: २८ वर्ष
उंची: १७३ सेमी
व्यवसाय: शिक्षण
निवास: कळमनुरी, जिल्हा हिंगोली
गट: इडब्ल्यूएल डीएम – ०१
मोबाईल: ९९२२९७९८५३

माझी परिवर्तन कथा

मी एम पी एस सी ची तयारी करत होतो. फेब्रुवारी २०२१ मध्ये माझे वजन जे आधी ६७ किलो होते ते अचानक कमी होऊन ६२ वर आले आणि माझी तब्बेत खालावली . मी चेकअप केलं तर माझी शुगर ३४० झाली होती. मला धक्काच बसला, कारण मी त्या अगोदर कधीही अशी टेस्ट केली नव्हती. मग काय, डॉक्टर साहेबानी सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशी गोळी सरु केली आणि सोबत हे ही सांगितले की ही गोळी तुम्हाला आयुष्यभर घ्यावी लागेल. तेव्हा मी खूप टेन्शन मध्ये होतो. पण मनाला वाटत होतं की यावर काहीतरी उपाय असेल म्हणून मी यूट्यूब आणि गूगल च्या माध्यमातून यावर वर काही उपाय आहे का ते पाहत होतो.

मग मला *डॉ दीक्षित* सरांचा चा विडिओ पाहायला मिळाला आणि तसेच मी गूगल वर सरांचे चे पेपर पण वाचले. माझा थोडा आत्मविश्वास वाढला. मी डॉ. नंदकुमार हाडगेकर यांना कॉल केला त्यांनी मला एचबीएवनसी आणि उपाशीपोटी इन्सुलिन ह्या चाचण्या करायला सांगितल्या. माझे एचबीएवनसी १०.९ आणि उपाशीपोटी इन्सुलिन ३.६ होते. हे पाहून सरांनी मला काही अजून टेस्ट करायला सांगितल्या. मग मी सी पेप्टाइड केली तर ते ०.६६४ म्हणजे खूप कमी होते. मग मला सरांनी एक महिना ही जीवनशैली करून पाहा असं सांगितलं.

मी पूर्ण एक महिना ही जीवनशैली केली तर माझं एचबीएवनसी ०.७ ने कमी झालं पण सी पेप्टाइड काही वाढलं नाही. पण मी जिद्द नाही सोडली आणि ह्या जीवनशैलीचे पालन सतत करत राहिलो आणि जास्तीत जास्त प्रमाणात सकाळी आणि संध्याकाळी २ तास योगासन केली. परत ३ महिन्यांनी टेस्ट केली तर माझं एचबीएवनसी ७.० झाले होते आणि सी पेप्टाइड ची पातळी १.१४ वर आली होती. हा माझ्या जीवनातील चमत्कार होता. परवाच केलेल्या रक्त परिक्षणात मला समजले कि मी मधुमेह-मुक्त झालो आणि आता डॉक्टरांच्या सल्ल्याने माझी सर्व औषधे बंद झाली आहेत. आता माझा आत्मविश्वास खप वाढला आहे आणि मला खरंच खूप भारी वाटत आहे.
*डॉ दीक्षित सर*, डॉ नंदकुमार हडगेकर आणि सर्व टीम चे खूप खूप धन्यवाद….

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts