यशोगाथा : सोनिया मनेक
परिचय पत्र
नाव: सोनिया मनेक
वय: ४९ वर्षे
उंची: १५० सेमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: मुंबई
समूह: मुंबई डी वाय डी एन सातवे आव्हान समूह
मोबाईल: ९८१९३८०९०८
माझी परिवर्तन कथा
मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, सांधेदुखी अशासारख्या व्याधींनी मी बरेच दिवस त्रस्त होते. हळूहळू माझी प्रकृती ढासळू लागली होती आणि अशक्तपणामुळे माझ्या दैनंदिन जीवनावर त्याचा वाईट परिणाम होऊ लागला होता.
अशावेळी २९ डी एम रेव समूहामुळे मला डॉ. दीक्षित जीवनशैलीबद्दल समजलं.
१ जून २०२५ रोजी आव्हानाची सुरुवात होणार आहे हे समजल्यावर मी निग्रह केला आणि त्यात सामील झाले. खरंतर रक्षाबंधन, गणेशोत्सव अशा लगेच येणाऱ्या सणांमुळे माझ्या घरचे माझ्याबद्दल साशंक होते. परंतु मी मागे हटले नाही.
मी समूहाच्या शिस्तीचं पालन केलं आणि माझ्या प्रकृती मध्ये मला लक्षणीय सुधारणा दिसून आली.
९० दिवसांच्या या आव्हानामध्ये मला मिळालेले परिणाम याप्रमाणे आहेत….
एचबीएवनसी ८.४ %पासून कमी होऊन ६.७% झाले.
वजन कमी होऊन ते सुरुवातीच्या ८९.४ किलोवरून ८०.१ किलो झाले.
कमरेचा घेर जो सुरुवातीला १३५ सेमी होता तो १२९ सेमी झाला.
९० दिवसीय हा प्रवास खरोखरच अतिशय सुंदर होता. दिवसातून दोनच जेवणं, ती ही योग्य अंतर राखून आणि जोडीला नियमित चालणे हे माझ्या आयुष्याचा अपरिहार्य हिस्सा बनला आहे.
या सर्व स्थित्यंतरामध्ये डॉ. दीक्षित यांचे मार्गदर्शन आणि आमच्या समूहाच्या शिवानी पोतनीस आणि पूजा पवार या मॅडमचे सहकार्य अतिशय मोलाचे आहे. त्यांनी केलेल्या मदतीसाठी आणि प्रोत्साहनासाठी मी सदैव त्यांची ऋणी राहीन.
ही जीवनशैली अतिशय प्रभावशाली आहे आणि मी आयुष्यभर ही पाळण्याचा निश्चय केला आहे. निरामय जीवनासाठी चा हा अत्यंत योग्य मार्ग आहे .इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन.


