यशोगाथा : सुरेश गुंडोबा शिंदे (२ नोव्हेंबर २०२५)
परिचय पत्र
*नाव – सुरेश गुंडोबा शिंदे
वय – ५६ वर्षे
उंची – १६८.८ सेमी
वास्तव्य – शेंदरी (सातारा)
व्यवसाय – शेती
समूह – एकलव्य ( ऑक्टोबर २५ पासून डीआरसीसी – लॉ कॉलेज रोड, पुणे)
मोबाइल- ९०११९८३४१०
माझी परिवर्तन कथा
तीन महिन्यांपूर्वी म्हणजे जुलै २०२५ मध्ये मला खूपच जुलाबाचा त्रास होऊ लागला. म्हणून मी डॉ दीपांजली पवार मॅडम यांच्याकडे गेलो. त्यांनी ग्लुकोमिटर वर शुगर चेक केली असता २४० आली. मग त्यांनी मला HbA1c टेस्ट करायला सुचविले. टेस्ट करता लक्षात आले की HbA1c 10.2% झाले आहे. डॉ नी मला ग्लूमेट 500 ही गोळी सकाळ संध्याकाळी १ -१ अशी घेण्यास सांगितली. नंतर आमच्या शेजारच्या दुकानातील आमचे सहकारी त्यांनी डॉ दीक्षित जीवनशैली बाबत यू ट्यूब वर व्हिडिओ बघण्यास सांगितले. मी डॉ ची गोळी ही घेत होतो व व्हिडिओ बघून जीवनशैली तंतोतंत पाळण्यास सुरुवात केली. सलग तीन महिने व्हिडिओ मधे सांगितल्या प्रमाणे जीवनशैली पाळली. व ६ ऑक्टोबर २५ रोजी म्हणजे ३ महिन्यानंतर परत HbA1c व फास्टिंग इन्सुलिन या दोन टेस्ट केल्या तर HbA1c १०.२ चे ५.६ येऊन फास्टिंग इन्सुलिन ३.९ आले.व मी नॉन डायबेटिस स्टेज मध्ये आलो.
तसेच माझे वजन ७५ वरून ६७ किलो झाले म्हणजे जवळपास ८ किलो ने कमी झाले. मी परत डॉ पवार मॅडम यांच्याकडे गेलो असता त्यांनी डायबेटिस साठी घेत असलेली गोळी बंद करून टाकली. मला खूप आनंद झाला. मी ७/१०/२५ रोजी पुणे येथील लॉ कॉलेज रोड येथे डॉ दीक्षित सरांच्या डायबेटिस रिवर्सल सेंटर मध्ये गेलो. व तिथे मेंबर झालो. माझा सत्कार करण्यात आला. माझा बॉडी मास index रिपोर्ट काढण्यात आला. तो ही खूपच छान आला (पॉईंट्स ७० व व्हिजरल फॅट ७) आले.
या जीवनशैली तंतोतंत पाळण्यासाठी माझ्या पत्नीची ही खूप मदत झाली. मला खूपच हलके वाटत आहे. एनर्जी वाढल्यासारखी वाटते आहे. जुलाबाचा त्रास आता पूर्णपणे बंद झाला आहे. यापुढे मी कायम ही जीवनशैली अंगीकारणार आहे व इतरांना ही या जीवनशैली ची माहिती देणार आहे.
डॉ दीक्षित सरांचे खूप खूप आभार की त्यांनी सुचवलेली जीवनशैली मुळे माझ्या मध्ये आमूलाग्र बदल झाला.
डॉ दीक्षित सर व टीम यांचे मनःपुर्वक आभार !
(मराठी लेखन: शिल्पा उनकुले)


