यशोगाथा : सुनील वडोदकर
परिचय पत्र
नाव: श्री.सुनिल वडोदकर
वय: 54 वर्षे
उंची: 165 सेंमी
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: नाशिक
समूह: Nashik DRC
मोबाइल: ९०२८१ ४०४८१
माझी परिवर्तन कथा
मी माझी शुगर तपासणी केली असता, मला डायबिटीस आहे असे लक्षात आले.
त्यानंतर मी 7/8 महिने आयुर्वेदिक औषधे घेत होतो. पण शुगर लेव्हल कमी होत नव्हती. मला डॉक्टर श्री जगन्नाथ दीक्षित यांच्या नाशिक सेंटर बद्दल माहिती मिळाली, तेव्हा मी नाशिक सेंटरला दि.12 मार्च 2025 ला भेट दिली. तेव्हा मला श्री नंदन देशपांडे सर यांनी डॉक्टर दीक्षित डाएट प्लॅन बद्दल संपुर्ण व्यवस्थित माहिती दिली व रक्त तपासणी करण्यास सांगितले.
मी दिनांक 13 मार्च 2025 ला रक्त तपासणी केले असता. माझी माझी HBA1C 8.0% , इन्सुलिन 7.46 व वजन 68.4 kg होते.
मी डॉक्टर दीक्षित डायट प्लॅन सुरू केला व 45 मिनिटे 4.5 किलोमीटर नियमित चालणे सुरू केले.
एक महिन्यानंतर दि. 11 एप्रिल 2025 ला पुन्हा रक्त तपासणी केली असता HbA1C 6.2 % व वजन 66.9 kg आले.
एकच महिन्यात मला खुप फरक जाणवला.
त्यानंतर परत दि. 11 मे 2025 ला रक्त चेक केले असता माझे HbA1C 5.4% व वजन 65.7 kg आले.
त्यानंतर दि. 10 जून 2025 ला परत रक्त चेक केले असता HbA1C 5.1% व वजन 65.4 kg आले.
त्यानंतर मला श्री. नंदन देशपांडे सरांनी तीन महिन्यांनंतर रक्त तपासणी करण्यास सांगितले.
त्याप्रमाणे मी दिनांक 24 सप्टेंबर 2025 रक्त तपासणी केले असता.माझी HbA1C 5.1%, इन्सुलिन 5.62 व वजन 63.6 kg आले.
त्यामुळे मला खूपच आनंद झाला.
मला झालेल्या फायद्यामुळे आणि समाधानामुळे मी सर्व टीम श्री. नंदन देशपांडे सर, वंदना जोशी मॅडम व डॉ. दीक्षित सरांचे खुप खुप आभार मानतो. मी आता मधुमेही पासून मधुमेहमुक्त झालो आहे.
माझ्या या वाटचालीत माझी पत्नी शिल्पाचा सिंहाचा वाटा आहे. ती सुद्धा या जीवनशैलीचा अवलंब करत आहे. तिच्यातही अमुलाग्र बदल झालेला आहे.
माझ्या सर्व मित्रांना व नातलगांना या जीवनशैलीमुळे झालेल्या फायद्या बद्दल व चांगल्या बदला बद्दल सांगत तर आहेच त्याच बरोबर त्यांना सेंटरला सुद्धा बरोबर घेऊन जात आहे.
मधुमेह मुक्त जीवन जगणे हे माझे ध्येय आहे. यासाठी मी डॉ दीक्षित जीवनशैली व चालणे + व्यायाम करणे नियमित चालु ठेवणार आहे.


