यशोगाथा : सुनिल कवडे (२८ सप्टेंबर २०२५)

0

यशोगाथा : सुनिल कवडे (२८ सप्टेंबर २०२५)

परिचय पत्र

नाव: सुनिल कवडे
वय: ५५ वर्षे
उंची: १७३ सेंमी
व्यवसाय: खाजगी नोकरी
वास्तव्य: चिंचवड, पुणे
समूह: DRC Pune
मोबाइल: ९८२२८५४४७२

माझी परिवर्तन कथा

मी एका खाजगी कंपनीत काम करतो. माझ्या कामाचे स्वरुप पूर्णपणे बैठे आहे. बैठ्या कामाच्या पद्धतीमुळे माझ्या वजनावर व्हायचा तोच परिणाम झाला. माझे वजन ९२.५ किलोला पोहचले. चालतांना खूप दम लागत होता. पाय पण खूप दुखत होते. त्यामुळे आळस खूप वाढला होता. शरीरात सुस्तावा आला होता.
एकदा आमच्या कंपनीमध्ये मेडिकल चेकअप झाले. मला शुगर आहे असा रिपोर्ट आला. शुगर अगदीच मधुमेहाच्या काठावर होती. माझे एचबीएवनसी ६.७% आले होते. मी हा रिपोर्ट पाहून खूप अस्वस्थ झालो, मन खूप खिन्न झाले. त्याच वेळी माझी पत्नी सौ. संगिता हिने मला डॉ. दीक्षितांच्या यूट्यूबवर असलेल्या जीवनशैलीबद्दल सांगितले. तिचा सल्ला मानून सरांच्या पुण्याच्या सेंटरमध्ये गेलो. ती तारीख होती २०.०३.२४. तिथे मला सर्व जीवनशैलीबद्दल समजावून सांगितले व उत्तम मार्गदर्शन देऊन उत्साह वाढवला.

त्याच सुमारास ९० दिवसांचे वजन कमी करण्याचे चॅलेंज पण सुरु झाले. अधिकस्य अधिकम् फलम् असा विचार करुन त्यात पण भाग घेतला. पहिल्याच महिन्यात माझे एचबीएवनसी ६.७ वरुन ५.९% आले. मला खूप आनंद झाला. मला या काळात अजिबात औषधे नव्हती. माझे वजन पण ८८ कि. झाले.
दुसऱ्या महिन्यात एचबीएवनसी ५.८% आले आणि वजन ८३.५ किलो पर्यंत उतरले. शरीरातील स्थूलपणा काही प्रमाणात कमी झाला होता. पाय दुखणे पण कमी झाले होते. आता थकवा, ताण-तणाव अजिबात जाणवत नव्हता. मनाला खूप छान व उत्साही वाटत होते.
सेंटरमधील सर्वांनी मला छान सहकार्य केले. डॉ. दीक्षित सरांचा व त्यांच्या सर्व टीमचा मला दिलेल्या निरपेक्ष सेवेबद्दल मनापासून आभार. मी ही जीवनशैली आचरून पूर्ण मधुमेह मुक्त्त होईन याची मला आशा नव्हे तर खात्रीच वाटते आहे. मला जो लाभ झाला तो मी प्रत्येक डायबेटिक पेशंटला सांगू इच्छितो व ही जीवनशैली सविस्तर समजून आचरणात आणावी असा आग्रह करतो.

 

(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts