यशोगाथा : सलीम शेख (तारीख १४ ऑगस्ट २०२५)
परिचय पत्र
नाव: सलीम शेख
वय: ५२ वर्षे
उंची: १७५ सेंमी
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९८५०७१७००५
माझी परिवर्तन कथा
नोव्हेंबर २०२३ मध्ये एकदा माझ्या डोळ्यात कचरा गेला होता. डोळा खूप लाल झाला होता. कचऱ्याचे कण डोळ्यात टोचत होते. मी डोळ्याच्या डॉक्टरांकडे गेलो. डोळ्यावर उपचार करायच्या वेळी त्यांनी मला शुगर चेक करायला सांगितली. शुगर चेक केली असता माझे एचबीएवनसी १२.३% आले. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी मला इन्सुलिनचे इंजेक्शन सुरु करण्याबद्दल सांगितले. मला खूप धक्का बसला. काहींनी मला माधवबाग मध्ये जाण्याचा सल्ला दिला. मी माधवबागमध्ये गेलो. सर्व रिपोर्ट पाहून त्यांनी मला अंदाजे एक लाख रु. खर्चाचा आकडा सांगितला. हे सर्व ऐकून हा खर्च आपल्या आवाक्यातला नाही याची मला जाणीव असल्याने मी तो नाद सोडला.
यूट्यूबवर मी डॉ. दीक्षित सरांबद्दल ऐकले होते. त्याचवेळेस मला माझ्या लोकमतच्या पेपरमध्ये D R C चा पत्ता मिळाला. २५ नोव्हेंबरला मी सेंटरला आलो. अटकेकर मॅडम व गोखले सरांनी माझे कौन्सलिंग केले व जीवनशैली काटेकोरपणे पाळा, तुम्ही नक्कीच डायबेटिस मुक्त्त व्हाल याची ग्वाही दिली.


मी ही जीवनशैली तंतोतंत पाळत होतो. मला बाहेर खाण्याची खूप सवय होती. आता ते पूर्णपणे बंद झाले. दर महिन्याला नियमितपणे एचबीएवनसी चा रिपोर्ट करुन मी सेंटरला येत होतो. माझे एचबीएवनसी १२.३ पासून ६.१% पर्यंत औषध न घेता उतरले. डॉ. स्वाती मॅडमना मी माझ्या तब्येतीचे इतर प्रॉब्लेमही सांगत होतो. ते त्या वेळोवेळी दूर करत होत्या. माझ्या पायाला सोरायसिसचा त्रास होता. त्यावर कोणतेही औषध घेत नव्हतो. पण काय आश्चर्य हा त्रास पण खूप कमी झाला. हा मला या जीवनशैलीचा बोनस लाभ आहे.
डॉ. दीक्षित सर मला देवाच्या जागीच वाटतात. त्यांची सेवा विनामूल्य असल्यामुळे सर्वांना करणे शक्य आहे. मी व माझी पत्नी ही जीवनशैली यापुढेही जन्मभर पाळणार आहोत. माझे वजनही ७ कि. ने कमी झाले. मी लवकरात लवकर मधुमेहमुक्त्त होईन याची आता खात्रीच वाटते.
मी डॉ. दीक्षित सर व त्यांच्या कामात सहभाग देणाऱ्या सर्व टीमचे मनापासून आभार मानतो. त्यांनी त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी दिली तर मी ती नक्की स्वीकारेन.
(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)