यशोगाथा : सरिता जितेकर (१० नोव्हेंबर)
परिचय पत्र
*नाव: सरिता जितेकर*
* उंची: १५३ सेमी*
वय: ३२ वर्षे
वास्तव्य: कोळखे, पनवेल
व्यवसाय: गृहिणी
समूह: Mumbai DYDN
मोबाईल: 8669632009
माझी परिवर्तन कथा
मी सरिता जितेकर. मला 2024 मध्ये मधुमेह झाल्याचे समजले. त्यावेळी मी यूट्यूबवर शोध घेतला आणि मला डॉ दीक्षित सरांचा व्हिडिओ सापडला. त्या व्हिडिओमधून मला वंदना मॅडम यांचा नंबर मिळाला. त्यांना कॉल करून मी डॉ. दीक्षित जीवनशैलीबद्दल माहिती घेतली. त्यांनी माझे रिपोर्ट पाहून मला दोन वेळा जेवण, 45 मिनिटे चालणे आणि गोड बंद ठेवण्याचा सल्ला दिला. हे पाळल्याने माझ्या शरीरात मोठा फरक जाणवला — साखरेची पातळी कमी झाली, ऍसिडिटीचा त्रास गेला आणि अनावश्यक खाण्यावर नियंत्रण आले.


वंदना मॅडम यांनी मला शिवानी मॅडम यांचा नंबर दिला. त्यांनी मला Mumbai DYDN Seven Challenge Group मध्ये अॅड केले. शिवानी मॅडमचे मार्गदर्शन खूप छान होते — ताट कसे असावे हे शिकवले. मी रोज जेवणाचे फोटो ग्रुपवर शेअर केले. नियमित 45 मिनिटे चालले आणि स्वामी सरांच्या योगा क्लासेसना हजेरी लावली.
एका महिन्यातच माझ्या साखरेचे प्रमाण कमी झाले. पहिल्या महिन्यात माझे HbA1c 8%, दुसऱ्या महिन्यात 6.5% आणि 90 दिवसानंतर ते 5.6% झाले. वजन 48 kg वरून 40 kg झाले आणि कंबर घेरही कमी झाला.
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे — फक्त दोन वेळा जेवणे आणि मध्ये काहीही न खाणे हे सहज शक्य झाले. योगा, ग्रुपमधील ऍक्टिव्हिटी आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला.
मी ही जीवनशैली कायम ठेवणार आहे आणि इतरांनाही प्रेरणा देणार आहे.
डॉ दीक्षित सर, पूजा मॅडम, शिवानी मॅडम, वंदना मॅडम आणि स्वामी सर यांचे मनःपूर्वक आभार.
(मराठी संपादन: सौ. अंजली जोशी)
