यशोगाथा : समीर देशपांडे
परिचय पत्र
नाव: समीर देशपांडे
वय: ४६ वर्षे
उंची: १६८ सेमी
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: कोल्हापूर / पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९८५०१३२५३५
माझी परिवर्तन कथा
आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचे कायॽ असा प्रश्न आपणांस कोणी विचारल्यास प्रत्येक व्यक्त्तीचे उत्तर आपापले वेगवेगळे असू शकते. पण माझ्या दृष्टीने पहिले आरोग्य, दुसरे पैसा, तिसरे योग्य मानसिकता हे होय.
मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असून जाड अंगकाठीत मोडत आहे. वयाच्या ४५ व्या वर्षापर्यंत मला काही त्रास नसल्यामुळे मी रक्त्त तपासणी केली नव्हती. परंतु DRC पुणे येथे रक्त्त तपासणी करणार आहेत हे कळल्यावर मी तेथे गेलो. रक्त्ताचा रिझल्ट पाहून धक्का बसला. एचबीएवनसी ७.३% आले व मला मधुमेह रुग्ण म्हणून शिक्का बसला. मग मी माझ्या सद्विवेक बुद्धीप्रमाणे अनेक गोष्टींचा, पर्यायांचा विचार करु लागलो. सल्ले खूप मिळू लागले.
पर्याय क्र. १ – माझ्या परिचितांकडून कडू कारले आणि कडुलिंबाचा पाला समप्रमाणात घेऊन त्याचा रस काढायचा व रोज दोन चमचे घ्यायचा. हा विचार फार रुचला नाही.
पर्याय क्र. २ – माझ्या एका परिचिताने मला हर्बल आयुष्य नाम एका संस्थेत नेले. तिथे सर्व जण गोड बोलत होते. त्याचा महिन्याचा खर्च ३ ते ४ हजार येणार होता. पण बाहेर आल्यावर एका जुन्या त्यांच्या पेशंटनी सांगितले की हे बंद केले की परत परिस्थिती मूळ पदावर येते. हाही पर्याय पटला नाही.
पर्याय क्र. ३ – एकाने मला स्मुदी नामक नविन संकल्पनेशी माझा परिचय करुन दिला. पण हा पर्याय प्रॅक्टिकल नव्हता.
पर्याय क्र. ४ – फक्त्त फळे खाण्याचा सल्ला मिळाला. त्यामधील फ्रुक्टोज की काय असते ते म्हणे मधुमेह नियंत्रणात आणते.
अशा सर्व प्रलोभनात माझे मित्र अविनाश गोखले यांनी डॉ दीक्षित जीवनशैली सांगितली व स्वतःचा अनुभव सांगितला. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी DRC मध्ये जाऊन त्यांना भेटून सर्व माहिती घेतली. तेच मला एकदा टिळकस्मारक मंदीरात डॉ. दीक्षित सरांच्या व्याख्यानाला घेऊन गेले. डॉ. दीक्षित सरांचे शब्द न शब्द मला आत कोठेतरी स्पर्श करत होते.
मी जीवनशैली अनुभवायचा पूर्ण निश्चय केला. नियमाने आचरण्यास सुरुवात केली. रोज मी दोन वेळा जेवण व दोन वेळा नाष्टा करत होतो. त्यामुळे दोनदाच जेवणाचे थोड अवघड वाटले. पहिला बदल करतांना चार आठ दिवस डोके दुखणे, चक्कर येते आहे असा भास होणे सुरु होते. चालायला सुरुवात करतांना माझ्या संपूर्ण शरीराला खाज सुटली आणि मला पुढे चालणे अशक्य झाले. तरी मी पुढे चालतच राहिलो. मला त्याची नंतर सवय झाली. मी त्यांच्या त्रैमासिक वेट लॉस चॅलेंजमध्ये पण भाग घेतला. या सर्व प्रवासात माझे एचबीएवनसी ७.२ वरुन ५.६% पर्यंत खाली आले. माझे वजनसुद्धा १० कि. ने कमी झाले.
या सगळ्याचे शतप्रतिशत श्रेय मी डॉ. दीक्षित सरांना व त्यांच्या टीमला मनापासून देतो. सगळ्यांची नावे घेणे कठीण आहे. पण मी या सर्वांचे आजीवन ऋण मान्य करतो. अजून एका व्यक्त्तीचे आवर्जून आभार व्यक्त्त करावे वाटतात ती म्हणजे माझी पत्नी वर्षा. तिच्या भक्कम साथी व पाठबळाशिवाय हे शक्य झाले नसते.
सर्वांनी ही जीवनशैली आचरणात आणण्याची खरोखरच आवश्यकता आहे.

