यशोगाथा : सचिन घारे

0

यशोगाथा : सचिन घारे

परिचय पत्र

नाव: सचिन घारे
वय: ४२ वर्षे
उंची: १६६ सेंमी
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: पुणे
समूह: DRC PUNE
मोबाईल: ९५१८७२८८२७

माझी परिवर्तन कथा

मला सतत भूक लागणे, तसेच वारंवार लघवीला लागणे आणि थोडेसे थकल्यासारखे वाटणे अशी लक्षणे जाणवत होती. त्यामुळे मी डॉक्टरांकडे गेलो आणि मला होत असलेला त्रास सांगितला. त्यांनी मला शुगर तपासणी आणि किडनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. मी लगेच निर्णय घेतला व रक्त्त तपासणी केली. त्यामध्ये उपाशीपोटी रक्तशर्करा २०८ आणि जेवणा नंतरची रक्तशर्करा २११ आली. डॉक्टरांनी गोळ्या सुरु करण्याचा सल्ला दिला. पण मी त्यांना स्पष्ट नकार देऊन आयर्वेदिक औषध सुरु केले. पण त्यामुळे मला प्रचंड ॲसिडिटीचा त्रास झाला.
माझे मित्र शेखर पळशीकर यांच्याशी याबाबत बोलत असतांना त्यांनी मला डॉ. जगन्नाथ दीक्षित सरांचा यूट्यूबवर व्हिडिओ बघण्याचा सल्ला दिला. मी D R C ला फोन केला असता त्यांनी मला दोन टेस्ट करुन येण्याचा सल्ला दिला. मी २०.०५.२०२३ ला टेस्ट केली असता माझे एचबीएवनसी ९.५% व उपाशीपोटी इन्सुलिन २.१ आल्याचे समजले. माझे वजनही बरेच वाढले होते (७२ किलो). D R C च्या सरांनी मला जीवनशैलीची पूर्ण माहिती दिली व वजन कमी करण्याचा सल्ला दिला. मी ही जीवनशैली तंतोतंत पाळली आणि ७ महिन्यात मी माझे एचबीएवनसी ९.५ वरुन ५.७% ला आणले. मी जवळ जवळ मधुमेह मुक्त्त होण्याच्या वाटेवर आहे. आता वजनही ६६ किलोपर्यंत उतरले आहे. मी फक्त्त जीवनपद्धतीच्या आधारेच कोणतेही औषध न घेताच हे यश प्राप्त करु शकलो.
मी डॉ. दीक्षित सरांचा खूप आभारी आहे. मी या जीवनशैलीचे पालन आयुष्यभर करण्याचा निश्चय केला आहे.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts