यशोगाथा : सौ अ ब क
परिचय पत्र
सदस्याच्या विनंतीनुसार नाव आणि फोन नंबर गुप्त ठेवण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्या.
तसेच फोटो खरे नाहीत, ते पर्प्लेक्सिटी एआय प्रो वापरून तयार केले आहेत. यशोगाथा प्रॉम्प्ट म्हणून दिली होती.
चला तिच्या गोपनीयतेचा आदर करूया!
नाव: सौ अ ब क
वय: ४९ वर्षे
उंची: १५५ सेंमी
वास्तव्य: बदलापूर
व्यवसाय: गृहिणी
माझी परिवर्तन कथा
फेब्रुवारी २०२४ मध्ये कळले की गेले सहा महिन्यापासून माझी तब्येत बारीक होत होती, माझे वजन कमी होत होते. नातेवाईक किती बारीक झालीस असे म्हणायला लागले तेव्हा मी माझी शुगर टेस्ट केली. त्यात उपाशीपोटी रक्त शर्करा २७५, जेवल्यानंतर ३३२ आणि एचबीएवनसी १४%, हे ऐकून मला धक्का बसला. मी लगेच आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेले तेव्हा त्यांनी मला शुगर च्या गोळ्या सुरू केल्या. मी डॉ जगन्नाथ दीक्षित यांचा नंबर डायल केला. तिकडे असणाऱ्या समन्वयकांनी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. माझ्या फॅमिली डॉक्टरांना मी त्या जीवनशैलीबद्दल सांगितले. ते अगोदर माझी गोळी बंद करायला तयार नव्हते तेव्हा डॉ दीक्षित यांच्या समन्वयकांनी त्यांना समजून सांगितले की गोळी बंद करा तेव्हा त्यांनी गोळी बंद केली. मग मी जीवनशैलीचे पालन सुरु केले.
मी रोजच्या जेवणात सुरुवातीला शेंगदाणे, बदाम, अक्रोड त्यानंतर सलाड (काकडी, कोबी, टोमॅटो, शिमला, मिरची), त्यानंतर मोड आलेले कडधान्य (मूग, मटकी, चणे, राजमा किंवा सोयाबीन वड्या) खायचे, त्यानंतर वरण, भात, भाजी, पोळी किंवा भाकरी (ज्वारी नाचणी) खायचे आणि शेवटी एक चमचा तूप घालून दूधही घ्यायचे. हे सर्व मी ५५ मिनिटात करत होते.
ते करत मी आता माझा एचबीएवनसी ५.९% आणला आहे. या जीवनशैलीचे असेच पालन करत मला मधुमेह-मुक्त व्हायचे आहे. या सर्व प्रवासात मला डॉ जगन्नाथ दीक्षित आणि त्यांच्या समन्वयकांनी खूप खूप मदत केली. माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून त्यांना कोटी कोटी धन्यवाद.

