यशोगाथा : श्रीधरन कल्याणसुंदरम्
परिचय पत्र
नाव: श्रीधरन कल्याणसुंदरम्
वय: ५५ वर्षे
उंची: १६८ सेंमी
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९२२५५०७४०३
माझी परिवर्तन कथा
मार्च २०२३ च्या आसपास माझे नातेवाईक आणि मित्र मी तंदुरुस्त दिसल्याबद्दल माझे खूप कौतुक करत होते. तंदुरुस्त दिसण्यासाठी मी कोणताही नविन व्यायाम करत नसल्यामुळे काहीतरी चुकीचे असावे अशी मला शंका आली व त्याप्रमाणे मी माझ्या डॉक्टरांशी बोललो व त्यांच्या सल्ल्याप्रमाणे रक्त्ताची तपासणी केली. रिपोर्ट पाहून मला खूप धक्का बसला. माझे एचबीएवनसी १३.५% होते.
माझ्या डॉक्टरांनी मला औषध सुरु केली व मला सांगितले की तुमचे सर्व अवयव साखरेच्या पाकात डान्स करत आहेत. औषध सुरु केल्यानंतर दोन दिवसात लगेचच मला हायपोचा त्रास सुरु झाला. त्यामुळे डॉक्टरांनी औषधाचा डोस सुरु केला. त्यावेळी मला माझ्या पत्नीने नैसर्गिक अन्न प्रमोट करणाऱ्या संस्थेशी जोडले. त्याचवेळेस मी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्हिडिओ पाहिले आणि मी दोन वेळा जेवणे सुरु केले. माझ्या डॉक्टरांना सांगितले की मी बिना औषधावर काही दिवस राहण्याचा प्रयत्न करणार आहे. मी अश्विनी मॅडमच्या द्वारे DRC पुणे यांच्याशी जोडला गेलो. एचबीएवनसी १३.५% असल्यामुळे त्यांनी काही टेस्ट करण्यास सांगितल्या.
दोन आठवड्यात माझे एचबीएवनसी ११.५% झाल्यामुळे मला आनंदाचा धक्का बसला. DRC पुणे येथे मला शिल्पा मॅडमने सर्व जीवनशैली समजावून सांगितली. मी ती जीवनशैली तंतोतंत पाळली व रोज न चुकता चालायला गेलो. एका महिन्यानंतर माझे एचबीएवनसी ९.७% आले. मला अधिकच उत्साह आला. मी खूप मोटिव्हेट झालो. पुढे तर ३ महिन्यात माझे एचबीएवनसी ६.८% आले. डॉ दीक्षित सरांनी IMA हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात माझे खूप कौतुक केले.
डॉ दीक्षित सर व ते ज्या टीमसोबत काम करत आहेत त्यांची बांधिलकी व समर्पण पाहून माझ्या मनाला त्याचा स्पर्श झाला. पुढील दोन महिन्यात जराही फरक पडला नाही तरी मी जिद्द सोडली नाही. मार्च २०२४ पर्यंत मी एचबीएवनसी ६.३% पर्यंत आणू शकलो. अशा तऱ्हेने माझा मधुमेही ते पूर्व-मधुमेही असा प्रवास झाला.
प्रेरणा कायम ठेवल्याबद्दल आणि प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी सतत पाठपुरावा घेण्यासाठी या टीमला मनापासून सलाम. ही उल्लेखनीय सेवा कोणत्याही शुल्काशिवाय दिली जाते हे या सेवेचे विशेष. मधुमेहासारख्या रोगात अशा साध्या जीवनशैलीमुळे नाट्यमय रितीने सुधारणा होते हे खरोखर थक्क करणारे आहे.
डॉ दीक्षित सर आणि त्यांच्या टीम सदस्यांसारख्या उदात्त व्यक्त्तींशी माझा संपर्क आला म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांच्या मार्गदर्शनासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. ट्रस्टला मी माझ्या छोट्याशा मार्गाने पाठिंबा देत राहीन.

