यशोगाथा : विठ्ठल थोरात

0

यशोगाथा : विठ्ठल थोरात

परिचय पत्र

नाव: विठ्ठल थोरात
वय: ६० वर्षे
उंची: १७३ सेंमी
व्यवसाय: लष्करातून सेवा निवृत्त
वास्तव्य: मांजरी (बुद्रुक), जिल्हा पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ८६६८७३७१०७

माझी परिवर्तन कथा

मी १०.०६.२०२३ रोजी अहमदनगरहून पुण्याला आल्यानंतर रात्रीची तहान लागणे आणि लगेच लघवीला लागणे असा त्रास होऊ लागला. मी माझे डॉक्टरांकडे तपासणीकरता गेलो. तपासणी केल्यानंतर माझी शुगर ५७५ आली. मी लॅबमध्ये जाऊन एचबीएवनसी टेस्ट केली असता ते १६.७% एवढे आले. मला स्वतःला शुगर किंवा एचबीएवनसी म्हणजे काय व ते किती असावे याची काही कल्पना नव्हती.
दुसऱ्या दिवशी माझी मुलगी सोनल मुळे बंगलोरहून आली व टेस्ट पाहून लगेच डॉ. दीक्षितांच्या पुणे सेंटरमधे जाण्यास सांगितले. मी २५.०६.२०२३ ला सेंटरमध्ये आलो आणि डॉ. दीक्षित सरांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेतले. मी त्यांनी सांगितलेली जीवनपद्धती अवलंबन करायला सुरुवात केली. मी दिवसातून दोनदाच जेवायला आणि एका तासात ६ कि. मी. चालायला सुरुवात केली. २५.०७.२०२३ ला परत एचबीएवनसी केले असता माझे रिडींग १०.४% आले. तेव्हा मला खूप आनंद झाला व समाधान लाभले. मी मधुमेहावर मात करु शकेन याचा आत्मविश्वास आला.
ऑगस्ट महिन्यात परत जेव्हा टेस्ट केली तेव्हा एचबीएवनसी चे रिडींग ७.४% आले. तेव्हा मला माझाच अभिमान वाटला. मी मधुमेहमुक्त्त होऊ शकेन याचा स्वतःवरचा विश्वास वाढला. मी चालणे व फक्त दोनदाच जेवणे याव्यतिरिक्त्त मध्ये फक्त्त पाणी पित असे.
आता मी खूप आनंदी आहे. माझ्या कुटुंबाची यात खूप मोलाची साथ आहे. मी डॉ. दीक्षित सरांचा खूपच आभारी आहे. मी या जीवनशैलीचे पालन जीवनभर करणार आहे.

 

(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts