यशोगाथा : राधिका मालेकर

0

यशोगाथा : राधिका मालेकर

परिचय पत्र

नाव: राधिका मालेकर
वय: ५२ वर्षे
उंची: १५५ सेंमी
व्यवसाय: चित्रकला शिक्षिका
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
भ्रमणध्वनी: ९८६०९०९९२९

माझी परिवर्तन कथा

मागच्या वर्षी २०२३ जून/जुलैच्या सुमारास माझे वजन वाढले होते. वाढत्या वयाची चिंता मला सतावत होती. एके दिवशी माझ्या नणंदेच्या बोलण्यात डॉ. जगन्नाथ दीक्षित सर व त्यांचे कार्य याबद्दल माहिती मिळाली. डॉ. दीक्षित सर विनासायास वेट लॉस करायला मार्गदर्शन करतात हे समजले. माझी नणंद डॉ. दीक्षित सरांच्या सेंटरला डायबेटीस कमी करण्याकरता येत असत. मी पण त्यांचा अनुभव ऐकून पुण्याच्या सेंटरला जाण्याच निर्णय घेतला.
सेंटरच्या नियमाप्रमाणे मी माझी एचबीएवनसी व उपाशीपोटी इन्सुलिनची टेस्ट केली. टेस्ट करुन मी नॉन डायबेटिक आहे याचा आनंद झाला. सेंटरला आल्यावर मला डॉ दीक्षित जीवनशैलीचे मार्गदर्शन केले व माझे दोन्हीही रिपोर्ट पाहून मी नॉन डायबेटिक नसून प्रि डायबेटिक आहे असे सांगण्यात आले. माझा थोडा भ्रमनिरास झाला. पण सेंटरहून बाहेर पडतांना मनाशी मी निश्चय केला. मी लवकरच नॉन डायबेटिक होईन व माझे वजनही उतरवेन.
मला सांगायला आनंद होतो की माझे ६ महिन्यात एचबीएवनसी ५.४ चे ५.१% झाले, उपाशीपोटी इन्सुलिन १५ चे ५.४ झाले व वजनही ५ कि. ने कमी झाले. पुढेही ते तसेच राहिले.
आता वजनही कमी झाले. पोटाचा घेर कमी झाला. त्यामुळे खूप फ्रेश वाटते. माझा काम करण्याचा उत्साह वाढला आहे. माझे रुटीन पण छान बसले आहे. याचा जादाचा फायदा म्हणजे माझा मुलगा केदार वय वर्षे २२ कॉम्प्युटरवरचे बैठे काम करतो. त्यामुळे हालचाल कमी होते. पण या जीवनपद्धतीमुळे काही त्रास होऊ म्हणून त्याने पण माझ्या बरोबर हीच जीवनशैली आत्मसात केली आहे.
मी डॉ. दीक्षित सर व त्यांच्या सर्व टीमचे मनापासून आभार मानते. ही जीवनपद्धती कायमस्वरुपी अंगिकारून नियमितपणे आचरणार आहे.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts