यशोगाथा : रश्मी वेंगुर्लेकर
परिचय पत्र
नाव: रश्मी वेंगुर्लेकर
वय: ५२ वर्षे
उंची: १६० सेंमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: डोंबिवली
समूह: मुंबई DYDN
मोबाईल: ९०८२७८४४३५
माझी परिवर्तन कथा
मला उच्च रक्तदाब, मधुमेह या समस्यांमुळे दैनंदिन जीवनात अडचणी येत होत्या. मधुमेहाच्या औषधापासून मुक्तता हवी होती. मला डॉ दीक्षित जीवनशैली आणि ७ वे ९० दिवसांचे मधुमेह रिवर्सल आणि वेटलॉस चॅलेंज बद्दल माहिती मिळाली ती श्री नंदकुमार हडगेकर यांच्या कडून. मला आधी शंका होती की मी हे चॅलेंज ९० दिवस करू शकेन की नाही, पण नंदकुमार सर यांनी मला प्रोत्साहित केले आणि मी आत्मविश्वासाने आणि ठामपणे या अभियानात सहभागी झाले. मी पूर्ण शिस्त पाळली, जेवणाचे फोटो शेअर केले, व्यायाम/ क्रियाकलाप अपडेट केले, अभियानात शिकवलेल्या सवयी अंगीकारल्या. याशिवाय आमचा उत्साह कायम ठेवण्यासाठी मेघना मॅडम रोज नवीन रेसिपीज शेअर करायच्या, सणाच्या दिवशी आठवणीने मेसेज करायच्या “आज आपण गोड खायचे नाही”. चॅलेंज मध्ये प्रत्येक आठवड्याला अॅक्टिविटी सुद्धा असायची. मी पण त्या अॅक्टिविटी मधे आनंदाने भाग घेत होते. पहिल्या महिन्यात माझे वजन कमी झाले, साखरेचे प्रमाण वाढले नाही, औषधे बंद झाली असा बदल दिसला. पुढील महिन्यांमध्ये अजून प्रगती झाली जसे की वजन कमी, चांगले ब्लड रिपोर्टस, म्हणजे माझी शुगर लेवल वाढली नाही, जीवनशैलीत बदल झाला. आता वेळ आली ९० दिवसानंतरच्या अंतिम निकालाची. माझे एचबीए१सी आधी ७.६ होते, ते आता ६.९ झाले, वजन ६४ किलो होते ते ५७ किलो झाले, कंबर १०६ सेमी होती, ती ९८ सेमी झाली. माझी मधुमेहाची औषधे बंद झाली, उर्जा वाढली. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जाणीव म्हणजे खाण्याच्या लालसेवर नियंत्रण, जे मला खूपच कठीण वाटत होते, विशेषत: चहा तोसुद्धा दूध आणि साखरे शिवाय, पण मला सांगताना आनंद होतो की मी त्यामध्ये सुद्धा यशस्वी झाले. आपल्या गोड खाण्याच्या सवयी वर आपण कसा कंट्रोल करावे यासाठी डॉ मुलमुळे यांचा व्हिडीओ सुद्धा खूपच उपयोगी पडला. डॉ दीक्षित सर अभियानामध्ये प्रत्येक आठवड्याला यूट्यूब वर विविध व्हिडिओ प्रसारित करत होते, आपल्या अगदी लहान लहान समस्यांचे समाधान त्यांच्या प्रत्येक व्हिडीओ मध्ये होते, ज्याचा जास्तीतजास्त फायदा मला झाला. मी नियमित एक्झरसाइज करण्यामध्ये यशस्वी झाली याचे श्रेय म्हणजे डॉ दीक्षित आणि त्यांची टीम, आणि ग्रूप एडमिन यांचे ग्रूप साठी घेतलेले अविरत श्रम व प्रयत्न. मी ही जीवन शैली रोजच्या जीवनात आत्मसात करून मधुमेहमुक्त आणि मधुमेह औषध मुक्त जीवनाचा आनंद घेत आहे आणि यापुढे ही घेईन. प्रत्येक तरुण, वरिष्ठ, आणि ज्येष्ठ नागरिक यांनी सुद्धा या विनामूल्य अभियानाचा फायदा घ्यायला हवा, ते ही केवळ स्वतःच्या सुदृढ शरीर व मनासाठी, आणि आनंदी जीवन जगण्यासाठी. अभियाना दरम्यान आपल्याला एचबीए१सी, उपाशीपोटी इंसुलिन या सारख्या चाचण्या खूप कमी दरामध्ये करता याव्यात यासाठी सुद्धा काही ठिकाणी (शहरांमध्ये) सोय केली आहे. खरच यापेक्षा मोठी समाजसेवा कुठली असू शकते?? डॉ रत्ना अष्टेकर आणि टीम यांचे सुद्धा खूप खूप आभार, कारण पावसाळा असल्याने, घरीच व्यायाम करण्यासाठी त्यांचे युट्यूब चे मार्गदर्शन अमूल्य ठरले. त्यांचे युट्यूब वर व्यायामासाठी वेगवेगळे व्हीडिओ आहेत जे खूपच सुंदर आणि उपयोगी आणि परिणाम कारक आहेत. मला सांगताना खूपच आनंद होत आहे की, डॉ दीक्षित जीवन शैली “माझ्या जीवनाचा टर्निंग पॉइंट” आहे की मी मधुमेह मुक्त जीवन जगू शकते आणि मी त्या मार्गावर आहे.
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ दीक्षित पूजा मॅडम आणि शिवानी मॅडम यांची मनापासून आभारी आहे.


(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)