यशोगाथा : रमेश बडे (२२ सप्टेंबर २०२५)

0

यशोगाथा : रमेश बडे (२२ सप्टेंबर २०२५)

परिचय पत्र

नाव: रमेश बडे
वय: ५० वर्षे
उंची: १७४ सेंमी
व्यवसाय: शिक्षक
वास्तव्य: पिरंगुट, पुणे
समूह: PUNE DRC
भ्रमणध्वनी: ९४०४१३१४१५

माझी परिवर्तन कथा

डिसेंबर २०२४ महिन्यात माझी पँट काचली होती. तेथील सर्व भाग लाल झाला होता. पायाचे घोटे पण खूप दुखत होते. दिसायला पण जरा अंधुक झाले होते. गुडघ्याला बधिरता आली होती.
मी स्वतः प्राध्यापक असल्यामुळे जवळ जवळ सर्व म्हणजे ५ तास उभे राहून शिकवावे लागत होते. शिकवत असतांना उभा रहात असे पण तेव्हा पाय दुखत नव्हते. मी उभा राहू शकत होतो. पण रात्री घरी गेल्यावर पायाचे घोटे खूप दुखत असत. हा त्रास मी १ महिना काढला. १८ जानेवारी २०२४ रोजी डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी शुगर चेक करायला सांगितली. त्याप्रमाणे शुगर चेक केली आणि माझे एचबीएवनसी १०.८ % पाहिल्यावर मला धक्काच बसला. डॉक्टरांनी औषधे घ्यायला लागणार असे सांगितले. पण मी डॉ. दीक्षित सरांचे व्हिडिओ पाहिलेले असल्यामुळे औषधाशिवाय डॉ. दीक्षित आपल्याला बरे करु शकतील याचा विश्वास वाटला व मी २० जानेवारी २०२४ ला पुणे येथील सेंटरला आलो. तिथे मला जीवनपद्धतीची सविस्तर माहिली मिळाली. व्यायाम व आहार यांचे तंतोतंत पालन याचे साखर कमी करण्यातले योगदान याबद्दल मी अवगत झालो.

घरी आल्यापासून मी सरांच्या जीवनपद्धतीत सांगितलेला आहार आणि विहार तंतोतंत पाळला. एकही दिवस खाडा केला नाही. याचा अपेक्षित फायदा झाला व मी मधुमेही रुग्णातून पूर्व मधुमेही झालो. माझे एचबीएवनसी १०.८ वरुन ६.१% आले ते ही कोणतेही औषध न घेता. मी रोज ५ ते ७ कि. मी. चालत होतो. आता गुडघ्याचा बधिरपणाही कमी झाला होता. घोटे पण रात्री दुखत नव्हते. माझ्या जीवनात आनंद परत आला होता. मी खूप खूष आहे.
हे सर्व डॉ. दीक्षित सर व त्यांच्या टीममुळे साध्य झाले याची मला पूर्ण जाणीव आहे. मी त्या सर्वांचे मनापासून ऋण मानतो व त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मी ही जीवनशैली नियमितपणे अंगिकारुन कायम मधुमेह मुक्त्त राहण्याचाच प्रयत्न करेन.

 

(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts