यशोगाथा : मुरलीधर गंभीररावजी नाकले

0

यशोगाथा : मुरलीधर गंभीररावजी नाकले

परिचय पत्र

नाव : मुरलीधर गंभीररावजी नाकले
वय: ४० वर्षे
उंची: १६० सेंमी
*व्यवसाय: नोकरी *
वास्तव्य: मुकुटबन, जिल्हा यवतमाळ
*समूह: ROMAH-THA-DYDN-GRP *
मोबाईल: ८०५५६५९२०७

माझी परिवर्तन कथा

एक जानेवारी २०२४ ला रक्त तपासणी केली असता माझे एचबीए१सी ७.००%, उपाशीपोटी इन्सुलिन ३.७८, वजन ६० किलो आणि पोटाचा घेर ९७ होता. म्हणजेच मी मधुमेही व्यक्ती मध्ये मोडत होतो. मला आयुष्यभर मधुमेहासाठी औषधे घ्यायची नव्हती. माझ्या एका मित्रा कडून मला रेवती देशपांडे यांचा नंबर मिळाला. त्यांनी मला डॉ. दीक्षित जीवनशैलीची माहिती व्यवस्थित सांगितली. दि. १५ जानेवारी २०२४ पासुन ९० दिवसीय मधुमेह रिव्हर्सल व वजन घट आव्हान सुरू झाले. मी ९० दिवसीय आव्हान मध्ये भाग घेतला व समूह गटप्रमुख यांच्या मार्गदर्शना प्रमाणे डॉ दीक्षित जीवनशैलीचे पालन सुरू केले. रोज ४.५ किमी चालणे व दिवसातून २ वेळा जेवणे चालू ठेवले. त्यामुळे माझ्यामध्ये खूप चांगला बदल जाणवला. आम्लपित्ताचा त्रास पण बंद झाला. तीन महिन्यातच माझे एचबीए१सी हे ६.१% वर आले, उपाशीपोटी इन्सुलिन १ यूनिट पेक्षा कमी झाले. वजन ७ किलो ने तर पोटाचा घेर ४ सेमी ने कमी झाले. म्हणजेच फक्त तीन महिन्यातच मी मधुमेही पासून पूर्व मधुमेही मध्ये आलो. मला अजूनपर्यंत मधुमेहासाठी औषधे घ्यायची गरज पडली नाही. मला विश्वास आहे की मी लवकरच औषधे न वापरता पूर्वमधुमेही पासून मधुमेह मुक्त होईन.
मला या आव्हानामध्ये गटप्रमुख दिलीप शेंडे सर, श्रीनिवास सर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. डॉ दीक्षित सरांना पण मनापासून धन्यवाद देतो. डॉ दीक्षित जीवनशैली ही जगातील सर्वोत्तम जीवनशैली आहे. मी आयुष्यभर या जीवनशैली चे पालन करेन आणि इतराना पण या जीवनशैली चे पालन करण्यास सांगेन.

 

(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts