यशोगाथा : माधव कुलकर्णी (८ ऑक्टोबर २०२५)
परिचय पत्र
नाव: माधव कुलकर्णी
वय: ६४ वर्षे
उंची: १६८ सेंमी
व्यवसाय: इलेक्ट्रोनिक्स उत्पादन
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९९२३३८८८१४
माझी परिवर्तन कथा
मी माधव कुलकर्णी ६४ वर्षांचा असून पुणे येथे रहातो. मला कधी मधुमेह असेल असे वाटत नव्हते. परंतु २०२४ च्या जून महिन्यात मी माझे जनरल चेकअप करायचे ठरवले व त्याप्रमाणे हे चेकअप केल्यावर मला मधुमेह झाल्याचे निदान झाले. माझे एचबीएवनसी ७.७% आले. मला हा रिपोर्ट पाहून धक्काच बसला. मला या वयात औषधे सुरु करायची नव्हती. औषधांमुळे होणारे दुष्परिणाम टाळायचे होते. मी डॉ. जगन्नाथ दीक्षित सरांबद्दल ऐकून होतो. त्यांचे मार्गदर्शन घेण्याकरिता त्यांच्या पुणे सेंटरला जाण्याचा निर्णय घेतला.
१५ जून २०२४ ला पुणे सेंटरला रिपोर्ट घेऊन गेलो. तिथे मला डॉ दीक्षित जीवनशैलीबद्दल व्यवस्थित माहिती मिळाली. तेथील डॉक्टरांनी औषधे घेऊ नका पण जीवनशैली व्यवस्थित पाळण्याचा सल्ला दिला. जीवनशैली पाळणार नसलात तर औषधे घ्यावी लागतील हे पण समजावून सांगितले.


मी ही जीवनशैली प्रामाणिकपणे पाळतो. मला चार महिन्यातच खूप फरक पडला. वजन ३.१५ कि. पोटाचा घेर ६ सें.मी. कमी झाला. व मुख्य म्हणजे एचबीएवनसी ७.७ वरुन ६.३% वर आले. मी मधुमेही रुग्णाच्या कॅटेगिरीतून पूर्व मधुमेही झालो. माझा उत्साह वाढला. मला सारखी झोप येत होती, ती पण कमी झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोटाचा घेर कमी झाल्यामुळे पॅंट व शर्ट बदलायची वेळ आली. त्याचा मला खूप आनंद झाला.
मी ही जीवनशैली कायम सुरु ठेवून पूर्णपणे मधुमेह मुक्त्त होण्याचा प्रयत्न करणार आहे. ते मी साध्य करेन याचा मला विश्वास आहे.
मी सध्या मला डायबेटिस झालेला कोणीही भेटला की मी त्यांना या जीवनशैलीबद्दल व सेंटरविषयी सांगतो. मला इथल्या सेंटरमध्ये खूप चांगल्या सूचना व सहकार्य मिळाले. जरी हे सेंटर पूर्णपणे मोफत चालत असले तरी अगत्य खूप असते. माझ्या ब्लडप्रेशरच्या गोळ्या पण कमी मात्रेच्या झाल्या.
मी आज खूप समाधानी आहे. अजून वजन उतरवण्याचा बराच टप्पा गाठायचा आहे व त्याकरता नक्कीच मी प्रयत्न करेन.
(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)