यशोगाथा : प्रमोद हंबरडे (६ ऑक्टोबर २०२५)

0

यशोगाथा : प्रमोद हंबरडे (६ ऑक्टोबर २०२५)

परिचय पत्र

नाव: प्रमोद हंबरडे
वय: ४२ वर्षे
उंची: १५५ सेमी
व्यवसाय: व्यापार
वास्तव्य: नांदेड
समूह: DRC Pune
मोबाईल: ८७९३९७८००९/९३०७९२३८०९

माझी परिवर्तन कथा

एप्रिल २०२४ महिन्यात मला खूप अशक्तपणा आला होता. सारखी चक्कर येत होती. कोणतेही काम करण्याचा उत्साहच नव्हता. करोनाच्या काळात मला करोना झाला असतांना रेमडीसिवरच्या इंजेक्शन दिली होती. त्याचा साइड इफेक्ट म्हणून मला तेव्हापासून अशक्तपणा वाटत होता. खूप जाडी वाढली होती. माझ्या उंचीच्या प्रमाणात माझे वजन जवळजवळ १० किलो ने जास्त होते.
एप्रिल महिन्यात नांदेड येथील डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी रक्ताच्या तपासण्या करायला सांगितल्या. त्यात मला मधुमेह झाल्याचे निदान झाले. माझा त्यांच्यावर विश्वास बसला नाही. मी नांदेडहून औरंगाबादला डॉ. इंदूरकरांचे नाव ऐकून दुसरा सल्ला घेण्याकरता आलो. त्यांनी माझे रिपोर्ट पाहून मला औषधे घेण्याचा सल्ला दिला व औषधे सुरु केली व ही औषधे जीवनभर घ्यावी लागतील म्हणून सांगितले. त्याचवेळी डॉ. दीक्षित जीवनशैलीबद्दल मला कळाले व पुण्याच्या सेंटरची माहिती मिळाली. मी नांदेडहून पुणे गाठले. २८ मे २०२४ ला प्रथम सेंटरमध्ये आलो.

माझ्या घरात कोणालाही मधुमेह नसल्यामुळे मला झाल्याचे कळाल्यावर माझ्या मनावर ताण आला. परंतु पुण्याच्या सेंटरवर मला अपेक्षेपेक्षा चांगली वागणूक, आत्मीयता मिळाली. सरांच्या टीमने माझे सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. जीवनशैलीबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले. माझा डायबेटीस नक्की जाईल याची शाश्वती दिली.
डॉ. स्वाती सामंत मॅडमनी माझी औषधे बंद केली. जर मी जीवनशैली चांगल्या रितीने व नियमित पाळली तर मला कधीच औषधे घ्यावी लागणार नाही याबद्दल निश्चिंत केले. रेमडीसिवर औषधाचा साइड इफेक्ट मी अनुभवला होता म्हणून मला जीवनभर मधुमेहाची औषधे घ्यायची नव्हती. हा माझा उद्देश इथे साध्य होत होता.
माझे एचबीएवनसी चार महिन्यातच ६.७ चे ५.९% झाले. वजनही २-३ किलो उतरले. पुढे आणखीन उतरेल यावरील विश्वास वाढला.
मी ही जीवनपद्धती आयुष्यभर सुरु ठेवणार आहे. मी नांदेडमध्ये बऱ्याच लोकांना याबद्दल सांगत असतो व पुढे पण सांगणार आहे. मी डॉ. जगन्नाथ दीक्षित सर व त्यांच्या टीमने मला दिलेल्या आत्मीयतेच्या वागणुकीबद्दल व केलेल्या मार्गदर्शनाबद्दल सर्वांना हृदयापासून धन्यवाद देतो.

(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts