यशोगाथा : प्रदीप भांगे (तारीख 4th Aug 2025)

0

यशोगाथा : प्रदीप भांगे (तारीख 4th Aug 2025)

परिचय पत्र

नाव: प्रदीप भांगे
वय: ३२ वर्षे
उंची: १५८ सेंमी
*वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९५०३७२७२०८

माझी परिवर्तन कथा

माझे वजन २०२१-२०२२ मध्ये लॉकडाऊन नंतर ५-६ किलोने वाढून ८६ कि. झाले होते. मी डॉ. दीक्षित सरांचे यूट्यूबला व्हिडिओ पाहून डाएट प्लॅन सुरु केला. चालणे पण सुरु केले. पण त्यात सातत्य नव्हते त्यामुळे वजनावर काहीच परिणाम झाला नाही.
घरात माझ्या आईला डायबेटीस असल्यामुळे अनुवंशिकतेमुळे मला मधुमेह होईल याची माझ्या मनात कायम भीती होती. मला त्यावेळी स्कीनचा प्रॉब्लेम झाला. मी मंचर येथील डॉ. टाके यांना भेटलो. त्यांनी मला तपासल्यावर रक्त्ताच्या काही टेस्ट करायला सांगितल्या. माझी रॅन्डम शुगर २८२ आली आणि मला मधुमेह असल्याचे निदान झाले. मंचर येथीलच डॉ. हर्षद शेटे यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली. त्यांनी गोळ्या पण चालू केल्या. दोन तीन महिन्यानंतर माझी शुगर कमी जास्त होत होती पण वजनात फरक पडत नव्हता.

मी डॉ. दीक्षित यांची जीवनशैली यूट्यूबवर ऐकली होती. पण किरकोळ कारणे देत मी ती आचरणात आणली नव्हती. आता मात्र काहीतरी उपाय करायचा हे ठरवून मी पुणे येथील D R C मध्ये गेलो. जातांना जोशीसरांनी फोनवर सांगितलेल्या दोन्ही टेस्ट करुन गेलो. तेव्हा माझे एचबीएवनसी ७.७% आले. मी मनातून घाबरलो होतो. पण मला डॉ. दीक्षित सरांनी धीर देऊन सांगितले की तुम्ही ही जीवनपद्धती योग्यप्रमाणे केली, व्यायाम नियमितपणे केला तर तुमचा मुधमेह रिव्हर्स होऊ शकतो. आता मला थोडा धीर आला. जोशी सरांनी मला ही जीवनशैली पूर्णपणे समजावून सांगितली.
महिनाभर या जीवनशैलीचे मी तंतोतंत पालन केले. एका महिन्यात माझा एचबीएवनसी ७.७ वरुन ६.२% झाला. वजन अंदाजे ४ कि. ने कमी झाले. मी नंतर ९० दिवस वजन कमी करण्याच्या चॅलेंजमध्ये भाग घेतला. आता वजन ६९ कि. झाले. मी खूप खूष झालो. D R C च्या डॉक्टरांनी माझी औषधे पण बंद केली होती.
मला डॉ. दीक्षित सर, जोशी सर, शिल्पा मॅडम यांचे खूप छान मार्गदर्शन मिळाले. माझ्या जेवणात प्रर्थिने, फायबर आणि कर्बोदकांचे प्रमाण किती असावे, जेवणातील पदार्थ कोणत्या क्रमाने खावे हे समजले. आता मी मधुमेहमुक्त्त होणारच. वेळोवेळी समूहातील सभासद आणि ॲडमिन्समुळे उत्साह वाढतो. मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो.

 

(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts