यशोगाथा : पार्वती संजय ननवरे
परिचय पत्र
नाव: पार्वती संजय ननवरे
वय: ५२ वर्षे
उंची: १४१.३ सेंमी
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: होलसेल व किरकोळ नारळ विक्रेते
समूह: DRCC Pune (DM group)
मोबाईल: ९०२१६६१७३४ / ८४८४९६०२२४
माझी परिवर्तन कथा
माझे नाव पार्वती संजय ननवरे असून माझे वय ५२ वर्षे आहे. माझे २ जानेवारी २०२४ ला एचबीएवनसी ६.९% होते. पण तेव्हा मला माहीत नव्हते की मला मधुमेह आहे. मला १२ मे २०२५ ला समजले की मला मधुमेह आहे.
तेव्हा माझे एचबीएवनसी ९.५% होते. तेव्हा मला डॉक्टरांनी औषध दिली. पण आम्ही ती औषध घेतली नाही. १६ मे २०२५ ला माझ्या मुली मला डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या सेंटरमध्ये घेऊन आल्या. इथे आम्हाला जीवनशैलीची माहिती मिळाली. मग मी १६ मे २०२५ पासून ही जीवनशैली सुरु केली. त्यावेळी माझे एचबीएवनसी ९.५% होते आणि वजन ६९.२० किलो होते. दर महिन्याला एचबीएवनसी चेक करून सेंटरमध्ये येण्यास सांगितले. त्याप्रमाणे जीवनपद्धती तंतोतंत पाळून मी येत होते.
१७ जून २०२५ मध्ये एचबीएवनसी ७.६% झाले व वजन ६५.६५ किलो झाले.
१७ जुलै २०२५ ला ६.७% व वजन ६४.६५ किलो झाले.
२३ ऑगस्ट २०२५ ला ६.१% व वजन ६३.३० किलो झाले आहे.
आता मी मधुमेहा पासून पूर्व-मधुमेहाच्या पायरीवर आले आहे. आता माझे प्रयत्न मधुमेहमुक्त होण्याकडे सुरू आहेत. मी डॉ. जगन्नाथ दीक्षित सर व सेंटरच्या सर्वांचे मनापासून आभार मानते. सर्व मधुमेही पेशंटना आवाहन करते की तुम्ही ही जीवनशैली पाळा व मधुमेहमुक्त व्हा. मी मनाशी निग्रह केला आहे की ही जीवनशैली आयुष्यभर पाळीन व मधुमेहमुक्त जीवन जगेन.

