यशोगाथा : निलेश भारती (१२ नोव्हेंबर)
परिचय पत्र
नाव: निलेश भारती
वय: ४३ वर्षे
उंची: १६४ सेमी
व्यवसाय: खाजगी नोकरी
वास्तव्य: मस्कत, ओमान
समूह: टेलिग्राम प्रीडायबेटिक ग्रुप
*मोबाईल: +91 9930546535 / +968 96176277 *
माझी परिवर्तन कथा
ऑक्टोबर २०२० मध्ये माझे वजन ८० किलो होते आणि माझा एचबीएवनसी ५.७% होता, ज्यामुळे मला मधुमेहाचा धोका असल्याचे दिसत होते. ऑगस्ट २०२३ पर्यंत माझे वजन हळूहळू ८२ किलोपर्यंत वाढले आणि एचबीएवनसी ६.८% झाले. वजन कमी करण्यासाठी मी जिम सुरू केले, पण काही विशेष बदल दिसला नाही. त्यामुळे निराश होऊन मी जिम सोडले.
त्याच काळात मला यूट्यूब वर डॉ. दीक्षित सर यांचे व्हिडिओ मिळाले. मी त्यांचे सर्व व्हिडिओ पाहिले आणि त्यांचे सल्ले पाळण्याचा प्रयत्न केला, पण भूक लागल्यामुळे काही दिवसांनी मी सोडून दिले.
मे २०२५ पर्यंत परिस्थिती आणखी बिघडली. माझे वजन ८३.८ किलो झाले. मला पाठीमध्ये प्रचंड वेदना सुरू झाल्या. तपासणीत स्पाईनमध्ये डिस्क बुल्ज आणि नर्व पेन असल्याचे समजले. डॉक्टरांनी सांगितले की वजन कमी केले नाही तर शस्त्रक्रिया करावी लागू शकते, कारण जादा वजनामुळे पाठीवर खूप ताण येत होता


या वेळेस मी आरोग्याबाबत खरोखर गंभीर झालो. मी पुन्हा डॉ. दीक्षित सरांचे व्हिडिओ पाहू लागलो आणि स्वत:ला बदल करण्याचे वचन दिले. सुरुवातीला दिवसातून फक्त दोन वेळा जेवण्याचा त्यांचा सल्ला पाळणे कठीण गेले. त्यामुळे मी काही आठवडे तीन वेळा—नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण—असे खाणे सुरू ठेवले. त्यानंतर मी दोन वेळच्या आहारपद्धतीचे अचूक पालन केले.
मी दररोज व्यायामही सुरू केला. मी धावत होतो आणि जिममध्ये ४५ ते ५० मिनिटे व्यायाम करत होतो तसेच रोज २० ते २५ मिनिटे पोहणेही सुरू केले. दोन महिन्यांत माझे ७.५ किलो वजन कमी झाले आणि कंबरेचा माप १०४ सेमी वरून ९७.५ सेमीपर्यंत आले. हा बदल पाहून मला आणखी प्रेरणा मिळाली. तीन महिन्यांत माझे एकूण १३.१ किलो वजन कमी झाले आणि कंबरेचा घेर १६ सेमीने कमी झाला. माझा एचबीएवनसी ०.६ ने घटला.
अनेक लोकांनी माझ्यातील बदल पाहून माझा ‘सीक्रेट’ विचारला. मी डॉ. दीक्षित सरांचे उत्कृष्ट मार्गदर्शन आणि श्री. भास्कर भट्टाचार्य यांचा पाठिंबा याबद्दल त्यांचे आभार मानतो. माझ्या प्रवासामुळे माझ्या संपूर्ण कुटुंबानेही आरोग्यदायी आहार सुरू केला. आता माझ्याकडे अधिक ऊर्जा आहे आणि मी खूप चांगले वाटते. ही नवी आरोग्यदायी जीवनशैली माझे आयुष्य खऱ्या अर्थाने बदलून गेली आहे आणि मला माझ्या आरोग्याची व मधुमेहाची काळजी घेण्यासाठी योग्य मार्ग सापडला याचे भाग्य वाटते.
(मराठी अनुवाद: डॉ रत्नाकर गोरे)
